TRENDING:

Petrolला पर्याय मिळाला, जगाची दिशा बदलणार शोध; समुद्रातूनच बनवलं पिण्याचं पाणी अन् इंधन, फक्त 24 रुपयांत

Last Updated:

चीनने समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून पिण्यायोग्य पाणी आणि ग्रीन हायड्रोजन तयार करणारी जगातील पहिली क्रांतिकारी सुविधा सुरू करून विज्ञान आणि अर्थव्यवस्था दोन्ही क्षेत्रात खळबळ उडवली आहे. फक्त 24 रुपयांत तयार होणारे हे पाणी आणि स्वस्त ऊर्जा जगातील महाशक्तींनाही टक्कर देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

बीजिंग: चीनने जगाला थक्क करणारी अशी क्रांतिकारी कामगिरी केली आहे की एकाच तीराने दोन मोठे जागतिक संकटांवर तोडगा मिळाला आहे. पहिला म्हणजे पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि दुसरा ग्रीन एनर्जीचा पर्याय होय. चीनच्या पूर्वेकडील  शेंडोंग प्रांतात समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून स्वच्छ पिण्यायोग्य पाणी आणि भविष्यातील ईंधन म्हणून गणले जाणारे ग्रीन हायड्रोजन तयार करणारी जगातील पहिली अनोखी सुविधा सुरू करण्यात आली आहे.

advertisement

या तंत्रज्ञानाची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याची किंमत होय. फक्त 2 युआन (सुमारे 24 रुपये प्रति घनमीटर). ही किंमत इतकी कमी आहे की पाण्याच्या तंत्रज्ञानात अग्रेसर मानले जाणारे सौदी अरेबिया, यूएई आणि सुप्रसिद्ध टेक्नॉलॉजी हब अमेरिका यांनाही चीनने मागे टाकले आहे.

advertisement

South China Morning Post च्या अहवालानुसार, ही सुविधा शेंडोंगच्या रिझाओ शहरात सुरू झाली असून ही पूर्णपणे समुद्राचे खारे पाणी आणि जवळील स्टीलपेट्रोकेमिकल फॅक्टर्‍यांतून तयार होणाऱ्या वेस्ट हीट वर चालते. म्हणजे आतापर्यंत वाया जाणारी फॅक्ट्र्यांची उष्णता आता पाणी आणि ईंधन निर्मितीसाठी वापरली जात आहे. ही संपूर्ण प्रणाली एक इनपुट आणि तीन आउटपुट या मॉडेलवर काम करते.

advertisement

एक इनपुट, तीन आउटपुट

या प्लांटमध्ये इनपुट म्हणून फक्त दोन गोष्टी लागतात. समुद्राचे खारे पाणी आणि फॅक्टरींची वेस्ट हीट.

यातून मिळतात तीन महत्त्वाचे आउटपुट...

advertisement

1) अत्यंत शुद्ध पिण्याचे पाणी :

दरवर्षी 800 टन समुद्राच्या पाण्यातून 450 घनमीटर अल्ट्रा-शुद्ध पाणी तयार होते. हे पाणी पिण्यासाठी किंवा उद्योगांमध्ये वापरण्यास योग्य आहे.

2) ग्रीन हायड्रोजन :

सालाना 1,92,000 घनमीटर ग्रीन हायड्रोजन तयार होतेभविष्यातील शाश्वत ईंधनाचा एक मोठा स्रोत.

3)ब्राइन (खनिजयुक्त द्रव) :

उर्वरित 350 टन ब्राइन समुद्री केमिकल्स तयार करण्यासाठी महत्त्वाचे कच्चामाल म्हणून उपयोगी ठरते.

जगातील सगळ्यात स्वस्त पाणी

चीनमधील समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण फक्त 24 रुपये/घनमीटर खर्चात होते.

सौदी/यूएई : सुमारे 42 रुपये

कॅलिफोर्निया (अमेरिका) : तब्बल 186 रुपये

याहूनही मजेशीर गोष्ट म्हणजे बीजिंगमधील नळाच्या पाण्याची किंमत 5 युआन आहे. तर हे समुद्राचे पाणी त्याच्या निम्म्यापेक्षा कमी खर्चात तयार होत आहे.

हायड्रोजन: भविष्यातील ईंधन, आता अधिक सुलभ

हायड्रोजन हे प्रदूषणमुक्त आणि शक्तिशाली इंधन मानले जाते. पण ते तयार करण्यासाठी प्रचंड वीज आणि अतिशय शुद्ध पाणी लागते. समुद्राच्या पाण्यातील मिठामुळे मशीन खराब होण्याचा धोका असतो. पण चीनच्या या नव्या तंत्रज्ञानाने हा अडथळा दूर केला आहे.

या प्लांटमध्ये तयार होणारे हायड्रोजन इतके मोठ्या प्रमाणात आहे की त्याद्वारे 100 बस दरवर्षी 3,800 किमी चालवता येतील. लाओशान लॅबोरेटरीचे वरिष्ठ अभियंता किन जियांगगुआंग यांनी सांगितले की, हे फक्त हायड्रोजन तयार करणे नाही; हे समुद्रातून ऊर्जा काढण्याचा एक नवा मार्ग आहे.

गंज लागण्याची समस्या संपली

सामान्यतः समुद्राच्या पाण्यातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क्लोराइड आयन इलेक्ट्रोडवर साचतात आणि मशीनचे नुकसान करतात. पण रिझाओतील प्लांटने तिन्ही आठवडे सतत कोणताही ब्रेक न घेता कार्य करून हे सिद्ध केले की त्यांनी या तंत्रज्ञानातील सर्वात मोठी समस्या सोडवली आहे.

हे तंत्रज्ञान अशा देशांसाठी आशेचा किरण ठरू शकते ज्यांच्याकडे समुद्र तर आहे. पण पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि ऊर्जेची साधने अत्यंत मर्यादित आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/science/
Petrolला पर्याय मिळाला, जगाची दिशा बदलणार शोध; समुद्रातूनच बनवलं पिण्याचं पाणी अन् इंधन, फक्त 24 रुपयांत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल