खरं तर अभिषेक शर्मा इतर चार सामन्यापैकी आजच्या सामन्यात थोडं गांभीर्याने खेळत होता. कारण मागच्या तीन सामन्यात घाईघाईत सिक्स आणि चौकार खेचण्यात बाद होत होता.त्यामुळे त्याला दिग्गज क्रिकेटपटूंनी मैदानावर थोडा वेळ देऊन खेळण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला मानत त्याने आज संयमीपणे मैदानात खेळायला सूरूवात केली होती. याचा त्याला फायदा झाला होता.
advertisement
दरम्यान संयम राखून खेळल्याने अभिषेक शर्माने 34 बॉलमध्ये आपले अर्धशतक पुर्ण केले होते. त्यानंतर झिम्बाबेकडून टिनोटेंडा मापोसा 13 वी ओव्हर घेऊन मैदानात आला होता. यावेळी त्याच्या ओव्हरसा सूर्यकुमार यादने फोर सिक्स मारले. त्यात अभिषेक शर्माने देखील हात धुतले होतेत.त्यानंतर शेवटचा बॉल खेळण्यापूर्वी झिम्बाबेचा कॅप्टन सिंकदर रझा टिनोटेंडा मापोसाजवळ आला आणि त्याने त्याला स्लोव्हर हॉल टाकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रझाने सांगितल्याप्रमाणे मापोसाने बॉल टाकला आणि अभिषेक ट्रॅपमध्ये अडकला. अभिषेक बॉल मारताना थेट सिंकजर रझाच्या हातात कॅच देऊन बसला आणि त्याची विकेट गमावली.
विशेष म्हणजे ज्या बॉलवर अभिषेक शर्मा आऊट झाला होता.तो बॉल स्लोव्हर बॉल होता. याच स्लोव्हर बॉलने अभिषेक शर्मा आणि टीम इंडियाला प्रचंड त्रास दिला आहे.त्यामुळे ज्या स्लोव्हर बॉलवर त्याने संयमाने खेळणे आवश्यक होते, त्याच बॉलवर तो बाद झाला. त्यामुळे अभिषेक शर्मा त्याच्या मागच्या चुकापासून काहीच शिकला नाही आणि सिंकदर रझाने त्याची दुखती नस दाबली.
