खरं तर मुंबई इंडियन्सने 5 ओव्हरमध्ये 64 धावा ठोकल्या असताना अजिंक्य रहाणेच्या पायात क्रम्प आला होता.त्याच्यानंतर फिजिओला मैदानात बोलवलं होतं.पण त्याचाही फारसा फायदा झाला नाही, आणि शेवटी अजिंक्य रहाणे मैदान सोडून बाहेर गेला होता.त्यामुळे त्याची दुखापत गंभीर होती, असे वाटले होते.त्यामुळे कोलकत्ता चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
दरम्यान आता अजिंक्य रहाणेने मॅचनंतर आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. आता बरं वाटतं आहे. पण आधी पायात खुप क्रॅम्प येत होत्या. पण मी लवकरच बरा होईन,असे अजिंक्य रहाणे दुखापतीवर बोलला आहे.
advertisement
220-225 ही एक चांगली धावसंख्या होती. गोलंदाजीचा ताफा नवखा होता, पण ही मुले शिकतील. मुंबई इंडियन्सने चांगली फलंदाजी केली,असे देखील अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. तसेच आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना रहाणे म्हणाले की, मी अजून तरुण आहे, छान वाटत आहे. मी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आशा आहे की ग्रीन लवकरच गोलंदाजी सुरू करेल. आम्ही खूप चांगली फलंदाजी केली, गोलंदाजीमध्ये संतुलन साधणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच ग्रीन गोलंदाजी का करू शकत नाही?यावर रहाणे म्हणाला हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारायला हवा.त्यामुळे त्याच्या या विधानाने सर्वांच्या भूवय्या उंचावल्या होत्या.
