एकाच मैदानावर सराव करूनही भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही. पाकिस्तानची टीम जेव्हा दुबईमधील आयसीसी अकादमीमध्ये सरावासाठी पोहोचली तेव्हा भारतीय खेळाडू आधीपासूनच तिथे सराव करत होते. पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना नेटवर घाम गाळताना पाहिलं, यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्यांचा सराव सुरू केला.
पाकिस्तानची टीम 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 नंतर दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये पोहोचली. आशिया कपआधी पाकिस्तानची टीम युएईमध्येच ट्राय सीरिज खेळत आहे. या सीरिजच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे, या सामन्याआधी पाकिस्तानची टीम सराव करण्यासाठी मैदानात आली.
advertisement
भारत-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला
9 सप्टेंबरपासून आशिया कप सुरू होत आहे, पण टीम इंडियाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. तर भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना 14 सप्टेंबरला होईल. भारत-पाकिस्तान यांच्यातला हा सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान रेकॉर्ड
आशिया कप यंदा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. आतापर्यंत आशिया कपच्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात 3 सामने झाले आहेत, यातले 2 सामने भारताने आणि एक सामना पाकिस्तानने जिंकला आहे.