आशिया कपमध्ये टीम इंडिया ज्या युएईविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे त्यांचे कोच लालचंद राजपूत आहेत. भारताने 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा लालचंद राजपूत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. आता ते युएईच्या टीमसोबत आहेत. आशिया कपआधी युएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 ट्राय सीरिज खेळवली गेली. या सीरिजमध्येही युएईच्या खेळाडूंना अनुभव मिळाला.
advertisement
लालचंद राजपूत यांनी डिवचलं
भारताविरुद्धच्या सामन्याआधी लालचंद राजपूत यांनी टीम इंडियाला डिवचलं आहे. भारत मोठी आहे, त्यांनी मागचा वर्ल्ड कपही जिंकला आहे. पण टी-20 फॉरमॅटमध्ये त्या दिवशी जी टीम चांगली खेळेल, ती जिंकेल. या फॉरमॅटमध्ये एक बॅटर किंवा एक बॉलरही तुम्हाला मॅच जिंकवून देऊ शकतो. आम्ही निडर होऊन खेळू. आमच्याकडे चांगले स्पिनर आहेत, जे भारतीय बॅटिंगला अडचणीत आणू शकतात. आमची बॅटिंगही मजबूत आहे, तसंच आम्हाला युएईमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. प्रत्येकाला टीम इंडियाविरुद्ध खेळायचं आहे. कुणीही घाबरलेलं नाही, आमचे खेळाडू तयार आहेत, असं लालचंद राजपूत म्हणाले आहेत.
आशिया कपसाठी युएईची टीम
मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यांश शर्मा (विकेट कीपर), आसिफ खान, ध्रुव पाराशर, एथन डिसुजा, हैदर अली, हर्षीत कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतिउल्लाह खान, मोहम्मद फारुर, मोहम्मद जवादुल्लाह, मोहम्मद जौहेब, राहुल चोप्रा (विकेट कीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंग, सगीर खान
टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षीत राणा, रिंकू सिंग