खरं तर संजू सॅमसनची आशिया कपसाठी निवड झाली होती.त्यानंतर शुभमन गिलची देखील संघात निवड झाल्याने संजू सॅमसनला संघात धोका निर्माण झाला होता.गिलमुळे संजूला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवले जाईल अशी चर्चा सुरू होती.पण अखेर आता यावर सुर्याने उत्तर दिले आहे.
आशिया कप स्पर्धेपुर्वी कर्णधार सुर्यकुमार यादव यांची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सुर्याला विचारले, भारताकडे दोन विकेटकिपर फलंदाज आहेत, जितेश आणि संजू, पण माझा प्रश्न संजूबद्दल आहे, संजूला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळेल का? यावर सूर्यकुमार यादव म्हणाला,आम्ही खरोखर संजूची चांगली काळजी घेत आहोत, काळजी करू नका आम्ही उद्या योग्य निर्णय घेऊ,असे म्हणत त्याने उत्तर टाळले आहे. पण त्याच्या काळजी घेण्याच्या विधानाने संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसेल,अशी शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
रवी शास्त्रीच गंभीर ऐकणार?
संजू सॅमसन हा पहिल्या तीन खेळाडूंपैकी सर्वांत खतरनाक खेळाडू आहे. तो तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो.त्यामुळे त्याला त्याचाच स्थानी खेळवा असे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे. संजूच्या जागी शुभमन गिलला आणण तितकंस सोप्प नाही आहे. गिललाही हटवणे सोप्पे नाही आहे.गिल कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास येऊ शकतो ,त्यामुळे सॅमसनसाठी सलामीवीराचे स्थान सोडलं पाहिजे असे रवी शास्त्री यांनी सांगितले होते.
दरम्यान संजू सॅमसनने मोठी घोषणा केली आहे.संजू सॅमसन त्याच्या केरला क्रिकेट लीगमधील कोची ब्लू टायगर्स संघाला लिलावात मिळालेले पैसे भेट म्हणून दिले आहेत. संजू सॅमसन या लीगमधला सर्वांत महागडा खेळाडू होता. त्याला कोची ब्लू टायगर्स संघाने 26.60 कोटी रूपयांना खरेदी केले होते.आता हीच रक्कम त्याने आपल्या संघातील खेळाडूंना आणि कोंचिग स्टाफला भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे संजू सॅमसन चं कौतुक होत आहे.
दरम्यान यंदाच्या हंगामात कोची ब्लू टायगर्सनी 75 धावांनी अरीस कोलम सेलर या संघाचा पराभूत करत केसीएलची ट्रॉफी जिंकली होती. या विजयासह कोची ब्लू टायगर्सला 30 लाखाची बक्षीस रक्कम मिळाली होती.त्यानंतर आता संजू सॅमसनने लिलावात मिळालेले 26.60 कोटी खेळाडूंना आणि कोचिंग स्टाफला दिले आहेत.त्यामुळे सॅमसनच्या निर्णयाचे आता कौतुक होत आहे.