बुलेट कॉफी हा एक कॉफीचा प्रकार आहे. त्यामध्ये उत्तम प्रतीची कॉफी, अनसॉल्टेड बटर आणि नाराळाच्या तेलातून मिळणारं मीडियम-चेन ट्रायग्लिसरायड्स वापरलं जातं. कॅफिन आणि फॅट्स असल्यामुळे या कॉफीतून फार लवकर एनर्जी मिळते. इंटरमिटंट फास्टिंग आणि केटो डाएट करणाऱ्यांमध्ये ही कॉफी लोकप्रिय आहे. या कॉफीमुळे पोट भरल्यासारखे वाटते, उर्जेची पातळी आणि एकाग्रता वाढते. ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बुलेट कॉफी चांगला पर्याय मानला जातो.
advertisement
Baking Material: केक बेकिंग बिझनेससाठी साहित्य हवंय? क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे स्वस्तात मस्त पर्याय
ही कॉफी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही. काही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, बुलेट कॉफीतील बटरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते. हार्ट डिसीज असलेल्यांना सॅच्युरेटेड फॅटचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या रुग्णांनी बुलेट कॉफीचं सेवन करू नये. तुम्हाला जर बुलेट कॉफी पिण्याची इच्छा असेल तर आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.