advertisement

बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने जीवन संपवलं, वडील म्हणाले- चुकीच्या पद्धतीने...

Last Updated:

स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले.

स्तुती सोनवणे मृत्यू प्रकरण
स्तुती सोनवणे मृत्यू प्रकरण
मुंबई : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात राहणाऱ्या आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान नामे बॉयफ्रेंड तिला त्रास देत होता, असा दावा तिने सुसाईड नोटमध्ये केला आहे. पोलिसांनी त्याला लोअर परळ येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती मानसिक तणावात असल्याचे आम्हाला जाणवले नाही, असेही ते म्हणाले.

स्तुतीचे वडील म्हणाले, तिच्या वागण्याबोलण्यातून आम्हाला कधीच जाणवलं नाही

स्तुतीही मानसिक तणावात होती हे आम्हाला तिच्या वागण्याबोलण्यातून जाणवले नाही. ती अभ्यासात हुशार होती. त्या रात्री ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत गेली होती, त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. मात्र ज्या गोष्टींमुळे ती तणावात होती, त्याबाबत तिने आम्हाला कधीच सांगितले नाही. सांगितले असते तर त्यातून मार्ग काढता आला असता, असे स्तुतीचे वडील म्हणाले. तसेच स्तुतीने केलेल्या आरोपांची चौकशी होऊन आरोपीला सजा झाली पाहिजे, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली.
advertisement

डेटिंग अॅपमधून ओळख, एक वर्षांचे रिलेशन

फजल मोहम्मद खान (वय वर्ष ३१) याला मुंबई पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्तुती आणि फजल मोहम्मद खान यांची ओळख एका डेटिंग अॅपवरून झाली होती. सुमारे वर्षभरापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. सुरुवातीला त्यांचे नाते खूप चांगले होते. मात्र काही महिन्यांनी त्यांच्यात वादविवाद व्हायला लागले. फजल मोहम्मद खान स्तुतीला मानसिक त्रास देत असल्याचे तिने नोटमध्ये लिहून ठेवले आहे.
advertisement

एक दिवस तू नक्की फ्रीजमध्ये सापडशील, मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांना कंटाळली

स्तुतीचे मित्रमैत्रिणीही तिला एक दिवस तू नक्की फ्रीजमध्ये सापडशील, असे टोमणे मारायचे. मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांनाही स्तुती कंटाळली होती. एकाचवेळी फजलचा त्रास आणि मैत्रमैत्रिणींचे टोमणे अशामुळे ती त्रस्त होती. अखेर तिने मंगळवारी सकाळी अँटॉप हिलमधल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने जीवन संपवलं, वडील म्हणाले- चुकीच्या पद्धतीने...
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement