Dhurandhar Movie: 'शरारत' गाण्यासाठी गायिकेने दिग्दर्शकासमोर ठेवलेली ‘ही’ अट; आदित्य धरला म्हणालेली…
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'शरारत' गाण्याच्या शुटिंगच्या आधी गायिकेने दिग्दर्शक आदित्य धर यांच्या समोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. तिने ठेवलेल्या अटचा गायिकेने एका मुलाखतीतून स्वत: खुलासा केलेला आहे.
मुंबई: सोशल मीडियासह सर्वत्र रणवीर सिंगच्या 'धुरंदर' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर फक्त चित्रपटातील सीन्सचीच नाही तर, गाण्यांचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे, आयेशा खान आणि क्रिस्टल डिसूझा यांनी परफॉर्म केलेले 'शरारत' गाणं होय. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. जास्मिन सँडलास आणि मधुबंती बागची या गायिकींनी हे गाणं गायलंय.
गाण्याच्या घवघवीत यशानंतर मधुबंती बागचीने अलीकडेच एक मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये गायिका मधुबंती बागचीने सुपरहिट गाण्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. गायिका मधुबंती बागची सुरुवातीला म्युझिक व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी नकार देत होती. बराच वेळ चर्चा केल्यानंतर तिने गाण्यासाठी होकार दिला. गाण्यामध्ये दिसण्यासाठी मधुबंतीने एक विशिष्ट अट घातली होती, ती अट निर्मात्यांना शेवटी मान्य करावी लागली.
advertisement
मधुबंतीने फेव्हर एचएम युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गायिकेने तिचा संपूर्ण अनुभव सांगितला. तिने सांगितले की, "मला स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करायला आवडतं, परंतू कॅमेऱ्यासमोर गाणं रेकॉर्ड करताना थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. स्टुडिओमध्ये जाऊन गाणं रेकॉर्ड करणं किंवा घरी राहणं याशिवाय इतर सर्वच गोष्टींबद्दल मला जरा संकोच वाटतो. त्यामुळे मी दिग्दर्शकांना विचारलं, त्या सीनमध्ये आधीच इतके कलाकार, डान्सर्स आणि लोक आहेत. मग आम्ही (जास्मिन सँडलास आणि मधुबंती बागची) का हव्या आहोत? पण त्यांनी अगोदरच गाण्याविषयी सर्व ठरवलं होतं. ते मला म्हणाले की, मला हेच हवंय आणि मी सर्व अगदी बरोबर करेल." मधुबंतीने व्हिडिओमध्ये येण्यासाठी एक शर्त ठेवली होती.
advertisement
मधुबंतीने शर्त सांगताना हसत म्हणाली की, "फक्त मला डान्स करायला लावू नका. कारण मला नाही वाटत की, लोकं मला डान्स करताना पाहायला हवं." चित्रपटाच्या म्युझिक लाँचिंग इव्हेंटमध्ये, रणवीर सिंगने मधुवंती आणि जास्मिनसोबत स्टेजवर खूप जबरदस्त डान्स केलेला होता. त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज् इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. चित्रपटामध्ये "शरारत" गाणं एका लग्न समारंभामध्ये गात असल्याचं दाखवलं आहे. त्या गाण्यावर आयशा खान आणि क्रिस्टल डिसूझा यांनी डान्स केलेला आहे. तर, मधुवंती आणि जास्मिन यांनी लाईव्ह परफॉर्मन्स केलेला आहे. शाश्वत सचदेवने हे गाणं लिहिलेलं आहे.
advertisement
आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट येत्या 19 मार्चला रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, काही दिवसातंच प्री बुकिंगमध्ये मजल मारली आहे. पेड प्रीव्यू शोमध्येही चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर कमाई केलेली आहे. असं म्हटलं जातय की, 'स्री 2' च्या पेड प्रीव्यूपेक्षाही अधिक कमाई चित्रपटाने केलीये. पेड प्रीव्यूमध्ये 2.8 लाखपेक्षा अधिक तिकिटांची विक्री करण्यात आली असून ज्यातून निर्मात्यांनी 15.64 कोटींची कमाई केलेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 3:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar Movie: 'शरारत' गाण्यासाठी गायिकेने दिग्दर्शकासमोर ठेवलेली ‘ही’ अट; आदित्य धरला म्हणालेली…








