advertisement

India Russia Oil Deal: ट्रम्प यांच्या 'ऑफर'वर SBI नं पाणी फेरलं! रशिया-भारत तेल डील धोक्यात, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

India Russia Oil Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची विशेष सवलत दिली आहे. मात्र, एसबीआय बँकेने पेमेंट करण्यास नकार दिल्याने खळबळ माजली आहे. काय आहे त्यामागचे कारण?

ट्रम्प यांच्या 'ऑफर'वर SBI नं पाणी फेरलं! रशिया-भारत तेल डील धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
ट्रम्प यांच्या 'ऑफर'वर SBI नं पाणी फेरलं! रशिया-भारत तेल डील धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
नवी दिल्ली: इस्रायल-अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतासह अनेक देशांमध्ये इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भारताने इंधन टंचाईवर मार्ग काढण्यासाठी रशियाकडून इंधन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत होण्यास कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच तेल पुरवठा विस्कळीत झाला असताना, आता रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांसाठी रशियन तेल खरेदी करण्याची मुभा दिली असली, तरी भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रशियन कंपन्यांचे पेमेंट करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement

नेमका पेच काय?

ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता, ज्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली होती. मात्र, जागतिक तणाव पाहता ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांची 'विशेष सवलत' दिली आहे. या सवलतीनंतर भारताने पुन्हा स्वस्त रशियन तेल खरेदी करण्याची तयारी केली, मात्र 'OilPrice.com' च्या रिपोर्टनुसार, बँका आता रशियन कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास घाबरत आहेत.
advertisement

SBI का घेत आहे माघार?

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया आपली जागतिक प्रतिष्ठा पणाला लावू इच्छित नाही. यासाठी दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत.
अमेरिकेने दिलेली ही सूट फक्त एका महिन्यासाठी आहे. एका महिन्यानंतर ट्रम्प पुन्हा निर्बंध लादतील का? याची शाश्वती नसल्याने बँक धास्तावली आहे.
अमेरिकन बाजारामधील हितसंबंधांचा विचारही बँकेकडून करण्यात आला. SBI च्या आंतरराष्ट्रीय कर्ज पोर्टफोलिओपैकी तब्बल २६ टक्के हिस्सा एकट्या अमेरिकेत आहे. रशियाला पेमेंट केल्यास अमेरिकेच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते आणि बँकेचा अमेरिकेतील व्यवसाय धोक्यात येऊ शकतो, अशी भीती बँकेला वाटत आहे.
advertisement

भारताच्या इंधन दरांवर परिणाम?

रशियाकडून स्वस्त तेल मिळाले नाही आणि आखाती देशांतील युद्ध थांबले नाही, तर भारतीय बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या या भूमिकेनंतर भारत सरकार आता पर्यायी पेमेंट व्यवस्थेचा (उदा. रुपया-रुबल व्यापार) विचार करत असल्याची चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
India Russia Oil Deal: ट्रम्प यांच्या 'ऑफर'वर SBI नं पाणी फेरलं! रशिया-भारत तेल डील धोक्यात, नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement