Baking Material: केक बेकिंग बिझनेससाठी साहित्य हवंय? क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे स्वस्तात मस्त पर्याय
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Baking Material: महिलावर्गामध्ये बेकिंग व्यवसाय सुरू करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. केक बेकिंग हा एक चांगला नफा मिळवून देणारा पर्याय ठरत आहे.
मुंबई: सध्याच्या काळात अनेक गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे पर्याय शोधतात. महिलावर्गामध्ये बेकिंग व्यवसाय सुरू करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. शिवाय अनेक तरुण उद्योजकांसाठी देखील केक बेकिंग हा एक चांगला नफा मिळवून देणारा पर्याय ठरत आहे. या व्यवसायाची सुरुवात करताना लागणारं बेकिंग साहित्य कुठे खरेदी करावं, हा अनेकांना प्रश्न पडतो. अशांसाठी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील 'मणिलाल प्रेमजी रंभिया' हे दुकान वन स्टॉप डेस्टिनेशन ठरू शकतं.
या दुकानात केक बेकिंगसाठी लागणारं सर्व साहित्याचं उपलब्ध आहे. शिवाय, फार कमी किमतीत दर्जेदार साहित्य मिळते. केक फ्लेवरचे इसेंस फक्त 40 रुपयांपासून मिळतात. व्हॅनिला, चॉकलेट, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी यांसारखे असंख्य फ्लेवर्स या दुकानात मिळतात. केकवर आकर्षक डिझाईन करण्यासाठी लागणारे मोल्ड आणि पेस्ट्री ट्रिप्स प्रत्येकी फक्त 50 रुपयांना उपलब्ध आहेत. यामुळे घरगुती केक देखील प्रोफेशनल दिसतो. तसेच केकवर सजावट करण्यासाठी लागणारे चॉकलेट्स आणि रंगीबेरंगी टॉपिंग्सचा डब्बा फक्त 80 रुपयांना मिळतो. यात स्प्रिंकल्स, चॉकलेट चिप्स, शुगर बॉल्स सारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.
advertisement
पेस्ट्री टिप्स बॉक्स 350 रुपयांना मिळत आहेत. त्यामध्ये 24 टिप्स आहेत. कुकी कटर 150 रुपयांना, पॅन केकचा साचा 180 रुपयांना आणि आईसक्रीम साचा केवळ 150 रुपयांना उपलब्ध आहे. याच दुकानात तुम्हाला बेकिंगसाठी लागणारं इतर साहित्य जसे की, व्हिपिंग क्रीम, फोंडंट, नोजल्स, केक बेस, बटर पेपर, सिलिकॉन मोल्ड्स, मेजरींग कप्स आणि स्पॅचुलासुद्धा अतिशय परवडणाऱ्या दरात मिळतात.
advertisement
तुम्हाला देखील बेकिंगची आवड असेल आणि त्याचं व्यवसायात रुपांतर करायचं असेल तर मणिलाल प्रेमजी रंभिया दुकानात अतिशय कमी किमतीत साहित्य मिळेल. कमीत कमी भांडवल गुंतवून तुम्ही तुमच्या स्वत:चा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Baking Material: केक बेकिंग बिझनेससाठी साहित्य हवंय? क्रॉफर्ड मार्केटमध्ये आहे स्वस्तात मस्त पर्याय