advertisement

आधी मलायका अरोरासोबत कोझी डान्स, आता VIRAL VIDEO वर सोराब बेदीने सोडलं मौन, सांगितलं दोघांमधलं खरं नातं

Last Updated:
Malaika Arora Viral Video: काही दिवसांपूर्वी मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आणि तिला नवा बॉयफ्रेंड मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं. अशातच, मलायकासोबत दिसलेल्या तरुणाने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
1/9
सलमान खानचा भाऊ अरबाझशी लग्न केल्यानंतर ती खान कुटुंबाची सून झाली. मात्र, काही वर्षांतच त्यांचं नातं तुटलं आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले.

2/9
पतीपासून वेगळं झाल्यानंतरही मलायका खंबीरपणे आपल्या आयुष्यात पुढे जात राहिली. त्याचवेळी अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलं. मात्र या आनंदी कपलमध्ये काहीतरी बिनसलं आणि या क्यूट कपलची प्रेमकहाणी संपली.

3/9
यानंतरही मलायकाचं नाव हर्ष मेहता या तिच्यापेक्षा १९ वर्ष लहान मुलासोबत जोडण्यात आलं. दोघांनी व्हॅलेंटाईन्स डेही साजरा केला.

4/9
काही दिवसांपूर्वी मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आणि तिला नवा बॉयफ्रेंड मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं. अशातच, मलायकासोबत दिसलेल्या तरुणाने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

5/9
नुकताच तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या लॉन्च पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यामध्ये मलायका 'स्प्लिट्सविला' फेम सोराब बेदीसोबत कोझी डान्स करताना आणि गप्पा मारताना दिसली. या व्हिडिओने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली.

6/9
दरम्यान, एका मुलाखतीत सोराबने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर लोक विनाकारण या गोष्टीचा बाऊ करत आहेत. तो म्हणाला,
दरम्यान, एका मुलाखतीत सोराबने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर लोक विनाकारण या गोष्टीचा बाऊ करत आहेत. तो म्हणाला, "मलायका आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. मी तिला माझ्या मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतोय. आमच्या मित्रमंडळींचा ग्रुप एकच आहे आणि आम्ही अनेकदा पार्ट्यांमध्ये भेटतो. मी आधीही तिच्यासोबतचे फोटो टाकायचो, पण तेव्हा मी इतका प्रसिद्ध नव्हतो, त्यामुळे कोणी लक्ष दिलं नाही. आता मी ओळखीचा चेहरा झालोय, म्हणून लोक याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत."
advertisement
7/9
सोराबने या मुलाखतीत नेटकऱ्यांच्या वागण्यावर नाराजीही व्यक्त केली. तो म्हणाला की, केवळ एक व्हिडिओ पाहून लोक थेट निष्कर्षावर पोहोचतात.

8/9
 "लोकांनी एखाद्या मुलीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी दोनदा विचार केला पाहिजे. अशा फालतू अफवांमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आमच्यात मैत्रीपलीकडे काहीही नाही, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो," असे खडे बोल त्याने सुनावले.

9/9
विशेष म्हणजे, ज्या रेस्टॉरंटच्या पार्टीवरून हा वाद सुरू झाला, तिथे मलायकाचा कथित बॉयफ्रेंड हर्ष मेहता देखील उपस्थित होता. पार्टी संपल्यानंतर मलायका हर्षसोबतच एकाच गाडीतून जाताना दिसली होती.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement