advertisement

गोविंदाला गोळी लागली तेव्हा ती एकदाही... डॉक्टरनं सुनिता अहुजाविषयी सांगितली धक्कादायक माहिती

Last Updated:

2024 मध्ये अभिनेता गोविंदा अहुजाच्या पायावर ज्या फिजियोथेरेपिस्टने उपचार केले, त्यांनी गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. अभिनेत्याने त्या काळामध्ये कशा पद्धतीने वैयक्तिक अडचणींना तोंड दिले, त्याविषयी फिजियोथेरेपिस्टने सांगितले.

News18
News18
मुंबई: अभिनेता गोविंदा अहुजाला 2024 मध्ये लायसन्स असलेल्या त्याच्या बंदूकीतून पायाला गोळी लागली होती. चुकून गोळी झाडली गेल्यानंतर अभिनेत्याच्या पायाला जखम झाली होती. त्यानंतर तात्काळ अभिनेत्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तिथे त्याच्या पायावर सर्जरी सुद्धा करण्यात आली. अभिनेता गोविंदा अहुजाच्या पायावर ज्या फिजियोथेरेपिस्टने उपचार केले, त्यांनी गोविंदाच्या तब्येतीबद्दल भाष्य केले. अभिनेत्याने त्या काळामध्ये कशा पद्धतीने वैयक्तिक अडचणींना तोंड दिले, त्याविषयी फिजियोथेरेपिस्टने सांगितले.
गोविंदा अहुजावर फिजियोथेरपी फिजियोथेरेपिस्ट डॉ. सुरभि धनवाला यांनी केली आहे. त्यांनी 'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "गोविंदाने स्वत:च्या पायाला चुकून बंदुकीतील गोळी मारलेली. जेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, तेव्हाच त्यांच्यावर मी तात्काळ उपचार करण्यासाठी सुरूवात केली. ते खूपच फिट आहेत. माझी त्यांच्यासोबत ॲक्सिडेंटच्या आधीही आणि ॲक्सिडेंटच्या नंतर सुद्धा भेट झाली होती. ते खूपच शिस्तप्रिय व्यक्ती आहेत. सकाळी लवकर उठणे, योगा करणे म्हणजेच एक उत्तम जीवनशैली फॉलो ते करतात. ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत."
advertisement
"अपघाताच्या वेळी त्यांच्या मांड्यांवर खूपच जखमा होत्या.", असं सुद्धा फिजियोथेरेपिस्टने सांगितलं. जेव्हा फिजियोथेरेपिस्टला अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मी केव्हाही सुनीता आहुजा यांना प्रत्यक्षात भेटले नाही. कारण त्या केव्हाच गोविंदाच्या कोणत्याही फिजियोथेरपीच्या सेशन्समध्ये सहभाग घेत नव्हत्या. "मी सुनीता यांना केव्हाही भेटले नाही आणि त्या केव्हाही गोविंदाच्या फिजियोथेरेपीच्या सेशन्समध्ये आलेल्या नाहीत. खरंतर, अभिनेता एक खूपच खंबीर व्यक्तिमत्व आहे. मला विश्वास आहे की तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवेल."
advertisement
डॉक्टरांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट सांगितले की, " गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यात जी काही समस्या आली आहे, त्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. या सर्वांचा अभिनेत्याला त्रास होत असला तरीही त्या सर्व गोष्टींचा सामना करण्या इतपत तो स्ट्राँग व्यक्ती आहे. गोविंदा तासन्‌ तास ध्यानधारणेत मग्न असतात. ते खूपच आध्यात्मिक असून, त्यांची देवावर खूप श्रद्धा आहे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या समस्यांसोबत कसं लढायचं, हे अभिनेत्याला माहिती आहे." गेल्या काही दिवसांपूर्वीच गोविंदा आणि सुनिताची लेक टीना अहुजाने आई- वडिलांच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिलेली होती. ती म्हणालेली की, "गेले दोन वर्षे अहुजा फॅमिलीसाठी चांगले राहिलेले नाही. त्या दिवसांत आम्ही सर्वांनी अनेक चढ-उतार पाहिलेय." दरम्यान, सुनिताने गोविंदावर एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता, ज्यावर त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की ते खरे नाही. "जर त्याचे स्वतःचे कुटुंब असे म्हणत असेल तर मी कोणाकडे पाहायचं? मी फक्त काम करतो आणि पुढेही करत राहील."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
गोविंदाला गोळी लागली तेव्हा ती एकदाही... डॉक्टरनं सुनिता अहुजाविषयी सांगितली धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement