दुबई: भारताने आशिया कपच्या सुपर 4 मधील पहिल्या दोन्ही मॅच जिंकून स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईत झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. याआधी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताची लढत अंतिम सामन्यात कोणाविरुद्ध होणार याचा निर्णय उद्या म्हणजे गुरुवारी होणार आहे. ही लढत पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात होईल.
advertisement
स्पर्धेतील सुपर 4 फेरीत श्रीलंकेने 2 लढती गमावल्याने त्यांचे आव्हान संपुष्ठात आले आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे प्रत्येकी 2 गुण आहे. यापैकी जो संघ उद्या जिंकणार तो भारताविरुद्ध फायनलमध्ये खेळले. उद्या जर पाकिस्तानने बाजी मारली तर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरी लढत पहायला मिळेल. नाही तर भारत आणि बांगलादेश यांच्यात फायनल होईल. आशिया कपची फायनल मॅच रविवारी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 25 टी-20 मॅच झाल्या असून त्यात पाकने 20 तर बांगलादेशने 5 मध्ये विजय मिळवला आहे. आकडेवारीत पाकिस्तानचे पारडे जड असेल तरी बांगालादेशचा संघ पाकला धक्का देऊ शकतो.
सुपर 4 मधील अखेरची लढत भारत आणि श्रीलंका यांच्यात 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र ही फक्त एक औपचारीकता असेल कारण भारत आधीच फायनलमध्ये पोहोचला तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली आहे.