TRENDING:

VIDEO : आधी संघातून हकालपट्टी,आता गल्लीतल्या बॉलरने विकेट घेतली, स्टार खेळाडूची लाज गेली

Last Updated:

बाबर आझमला गल्लीतल्या एका बॉलरने क्लिन बोल्ड केले आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.त्यामुळे आता बाबर आझमची लाज गेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Babar Azam Video : पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मध्यंतरीच्या काळात मोठी उलथापालथ झाली होती. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची संघातून हकालपट्टी झाली होती. या हकालपट्टीनंतर अजून तरी खेळाडूंची संघात वापसी झाली नाही आहे.त्यामुळे मोठी नाचक्की झाली होती. त्यानंतर आता बाबर आझमला गल्लीतल्या एका बॉलरने क्लिन बोल्ड केले आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.त्यामुळे आता बाबर आझमची लाज गेली आहे.
babar azam
babar azam
advertisement

सोशल मीडियावर बाबर आझमचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाबर आझम एका गल्लीतल्या गोलंदाजासमोर क्लिन बोल्ड झाला आहे. या संदर्भातला हा व्हिडिओ आहे.खरं तर बाबर आझम प्रॅक्टीस सामन्यात खेळत होता.या सामन्यात खेळताना त्याला एका बॉलरने आऊट केलं होतं. एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला एका युवा बॉलरने आऊट केल्याने बाबर आझमची पुर्णत लाज गेली आहे.

advertisement

advertisement

पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमने पीएसएलमधील पेशावर झल्मी आणि लीजेंड्स इलेव्हन यांच्यात झालेल्या एका प्रदर्शनीय मॅचमध्ये आपला जलवा दाखवला. रंजक ठरलेल्या या मॅचमध्ये बाबरने आपल्या ऑलराऊंड कौशल्याचे प्रदर्शन करत झल्मी संघाला लीजेंड्स संघाविरुद्ध सहा रनने विजय मिळवून दिला.

एक्झिबिशन ही मॅच पाकिस्‍तानमधील पूरग्रस्तांना मदत निधी गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या मॅचमधील सर्वात आठवणीतला क्षण तो होता, जेव्हा लिजेंडरी गोलंदाज शोएब अख्तरला बाबरने सलग दोन फोर मारले. शोएब अख्तर सराव नसल्याने थकल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, बाबरने शोएबला एक मोठा सिक्स आणि त्यानंतर दोन फोर मारताना पाहिले गेले.

advertisement

बाबरने केवळ 20 बॉलमध्ये 35 रन बनवले. त्यानंतर स्पिनर सईद अजमल बॉलिंगसाठी आला. बाबरने अजमलच्या बॉलवर एक सिक्स मारून 22 बॉलमध्ये 41 रन बनवले. पण पुढच्याच बॉलवर अजमलने त्याची स्टंप उडवून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : आधी संघातून हकालपट्टी,आता गल्लीतल्या बॉलरने विकेट घेतली, स्टार खेळाडूची लाज गेली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल