TRENDING:

BCCI च्या पत्रानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! 24 तासाच चार बड्या डायरेक्टर्सने सोडलं पद! चाललंय काय?

Last Updated:

Bangladesh Cricket Board Crisis : बीसीसीआयच्या पत्रानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डात भूकंप आला असून एकाच दिवसात तब्बल 4 बड्या डायरेक्टर्सनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
BCB President Aminul Islam : गेल्या दोन दिवसांपूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डातील (BCB) अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला होता. अशातच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला एक पत्र देखील लिहिल्याची माहिती समोर आली होती. अशातत आता बीसीसीआयच्या पत्रानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डात भूकंप आला असून एकाच दिवसात तब्बल 4 बड्या डायरेक्टर्सनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
Bangladesh Cricket Board Crisis 4 Director Resign
Bangladesh Cricket Board Crisis 4 Director Resign
advertisement

क्रिकेट वर्तुळात खळबळ

विशेष म्हणजे, यातील बहुतांश सदस्यांनी बोर्डात 6 महिनेही पूर्ण केले नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या स्थिरतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारच्या बोर्ड मीटिंगनंतर सनियान तनीम, मेहराब आलम, फैयाजुर रहमान आणि मंजुरुल आलम यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. इतकी उलथापालथ होऊनही बीसीबीचे प्रेसिडेंट अमीनुल इस्लाम मात्र पदावरून हटण्यास तयार नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

advertisement

Bangladesh Cricket : आशिया कपची चाहूल अन् बांग्लादेश गुडघ्यावर! BCCI ला लिहिलं पत्र! काय मागणी केली?

निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप

"मी शेवटपर्यंत पदावर राहीन," असा पवित्रा अमीनुल इस्लाम यांनी घेतला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते, ज्याचा चौकशी अहवाल आता सरकारला सादर करण्यात आला आहे. बोर्डावर सध्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीचा मोठा दबाव असून राजकीय हस्तक्षेप आणि घराणेशाहीच्या आरोपांमुळे अमीनुल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर आता त्यांना आपली भूमिका बदलावी लागेल की काय? असा सवाल विचारला जातोय.

advertisement

आयसीसीमध्ये काम करण्याचा अनुभव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडक उन्हाचा कांदा शेतीवर परिणाम, पिकाचे कसे कराल संरक्षण? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

आयसीसीमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्यानेच मी या पदावर आहे आणि देशासाठी मी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे, असं अमीनुल म्हणाले. अमीनुल यांच्या मते, बोर्डातील त्यांची टीम अत्यंत प्रामाणिक आणि डेडिकेटेड असून त्यांच्या मदतीनेच त्यांना बांगलादेश क्रिकेटची सेवा करायची आहे. अमीनुल इस्लाम यांचा हा प्रवास मे 2025 मध्ये सुरू झाला होता, जेव्हा त्यांनी फारूक अहमद यांची जागा घेतली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI च्या पत्रानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! 24 तासाच चार बड्या डायरेक्टर्सने सोडलं पद! चाललंय काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल