भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सौराष्ट्रचे माजी फलंदाज सितांशू कोटक यांची गुरुवारी टीम इंडियाचे फलंदाजीचे कोच म्हणून नियुक्ती केली आहे.
ना घरचे नोकर, ना करिना, सैफला रुग्णालयात कोणी नेले? रुग्णालयातून आली मोठी अपडेट
इंग्लंड विरुद्ध होणारी टी-२० आणि वनडे मालिका तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी बोर्डाने तातडीने हा निर्णय घेतला. ५२ वर्षीय कोटक हे अनेक वर्षापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजीचे कोच आहेत. ते सिनिअर आणि ए टीम सोबत अनेक वेळा परदेशी दौऱ्यावर गेले आहेत. या निर्णयामुळे अभिषेक नायर यांच्यावर दबाव वाढला आहे. नायर सहाय्यक कोच असताना भारताची कामगिरी अतिशय खराब झाली होती.
advertisement
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,हे स्पष्ट आहे की अभिषेक नायर यांच्यापासून खेळाडूंना मदत मिळत नाहीय. कोटक मोठ्या कालावधीपासून कोच आहेत आणि खेळाडूंचा त्यांचा विश्वास आहे.
सैफ अली खान आहे क्रिकेट संघाचा मालक, मिळवतो बक्कळ पैसा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय फलंदाज उघडे पडले. फलंदाजांच्या अनेक त्रुटी समोर आल्या. विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेचे चेंडू खेळून बाद होत होता. कोटक यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये १५ शतकांसह ८ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
भारतीय संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. असे म्हटले जाते की,नायर यांच्या कामगिरीवर बोर्डाची नजर आहे. ते फक्त वरिष्ठ खेळाडूंसाठी उपलब्ध असतात.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सहाय्यक स्टाफच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. विराट कोहली सारख्या फलंदाजाला जेव्हा अपयश येते तेव्हा या लोकांना जबाबदार धरले पाहिजे होते. भारताच्या सहाय्यक स्टाफमध्ये गोलंदाजीचे कोच म्हणून मोर्ने मार्केल, नेदरलँडचे रियान टेन डोइश हे फिल्डिंग कोच आहेत.