ना घरचे नोकर, ना करिना, सैफला रुग्णालयात कोणी नेले? लिलावती रुग्णालयातून आली मोठी अपडेट

Last Updated:

Saif Ali Khan News: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरीच हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सैफवर सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

News18
News18
मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरीच हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वांद्रे येथील घरात झालेल्या या घटनेनंतर आता सैफवर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लिलावती रुग्णालयातून डॉक्टरांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार सैफची प्रकृती स्थिर आहे. त्याला कोणताही धोक नाही. डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतर पोलिस सैफचा अधिकृत जबाब नोंदवणार आहेत. दरम्यान रात्री हल्ला झाल्यानंतर सैफला तातडीने रुग्णालयात कोण घेऊन आले याबाबची माहिती समोर आली आहे.
सैफवर मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर त्याचा मित्र इब्राहिमने त्याला अवघ्याकाही मिनिटात रुग्णालयात पोहोचवले. सैफ रुग्णालयात पोहोचल्यानंतर करिना आणि करिश्मा या १५ मिनिटांनी लिलावाती रुग्णालायत पोहोचल्या.
advertisement
दरम्यान, हल्ला करणारी व्यक्ती इमारतीच्या मागच्या गेटमधून आत आली. गुरूवारी मध्यरात्री 3 वाजेच्या जवळपास ही घटना घडली. सैफ वांद्रे येथील 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहतो. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच त्याचे खासगी सुरक्षा रक्षक आहेत. लिफ्टच्या ठिकाणी सुद्धा व्यक्ती असते. अशावेळी मध्यरात्री हा चोर इमारतीत घुसला कसा? तो नोकरांशी वाद का घालत होता. तर सैफ अली खानसोबत त्याने झटापट केली. त्यावेळी नोकर काय करत होते. चाकू हल्ल्यात सैफ गंभीर होईपर्यंत आरडाओरड झाली नाही का? तो चोरच होता की इतर कोणी? याचा पोलीस तपास करत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने घरातील नोकर, लिफ्ट मॅन, सुरक्षा रक्षक यांची चौकशी सुरू केली आहे. नोकरांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
advertisement
या हल्ल्यात सैफच्या घरात काम करणारी एक महिला देखील जखमी झाली आहे. दरम्यान पोलिसांनी या हल्ल्याच्या तपासासाठी १५ पथके तयार केली आहेत. या घटनेचा सलमान खानशी जवळीक असल्याचा काही संबंध आहे का? तसेच काळवीट प्रकरणामुळे हा हल्ला झाला का याची देखील चौकशी सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
हल्लाझाल्यानंतर फॉरेन्सिक टीमने घरातल्या विविध टिकाणच्या फिंगरप्रिंट्स घेतल्या आहेत. तसेच फ्लोअरिंग आणि फिनिशिंगचे काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली आहे. सैफच्या घरी दोन दिवासपासून हे काम सुरू होते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
ना घरचे नोकर, ना करिना, सैफला रुग्णालयात कोणी नेले? लिलावती रुग्णालयातून आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement