TRENDING:

IPLमध्ये 20व्या ओव्हरचा थरार पुन्हा पाहायला मिळणार, धोनी खेळेल, नक्की खेळेल; CSK च्या सीईओंनी केलं शिक्कामोर्तब

Last Updated:

MS Dhoni: आयपीएल 2026 पूर्वी एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनी पुढील हंगामात खेळणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चेन्नई: IPL 2026 चा हंगाम जवळ आला असून प्रत्येक वर्षी सर्व चाहत्यांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल 2026 आधी एमएस धोनी निवृत्ती घेणार का, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. फ्रँचायझीचे CEO कासी विश्वनाथन यांनी स्वतः धोनीच्या खेळण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
News18
News18
advertisement

पत्रकारांशी बोलताना विश्वनाथन यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की, पुढील हंगामात धोनी खेळणार का? त्यावर त्यांनी ठाम शब्दांत उत्तर दिले, “तो खेळेल, नक्की खेळेल.” या एका वाक्याने सोशल मीडियावर सुरू असलेल्या निवृत्तीच्या चर्चांना ब्रेक लागला.

CSK आणि धोनी

एमएस धोनी आयपीएलच्या सुरुवातीपासून चेन्नई सुपर किंग्जसोबत जोडले गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली CSK ने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त सर्वाधिक विजेतेपद. ‘थाला’ म्हणून ओळखला जाणारा धोनी हा केवळ खेळाडू नाही, तर CSK च्या ओळखीचा केंद्रबिंदू आहे. IPL 2024 आधी धोनीने कर्णधारपद सोडून जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती. त्यानंतर तो फक्त खेळाडू म्हणून संघात राहिला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

advertisement

CSK चा खराब हंगाम, पण धोनीवर विश्वास कायम

गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने इतिहासातील सर्वात निराशाजनक कामगिरी केली. 14 पैकी फक्त 4 सामने जिंकत संघ 10 संघांच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. सलग दुसऱ्या वर्षी CSK प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. तरीही फ्रँचायझीने धोनीवरील विश्वास कायम ठेवला आहे. त्याची उपस्थिती संघासाठी केवळ मैदानापुरती मर्यादित नसून ड्रेसिंग रूममध्येही मोठी ताकद मानली जाते.

advertisement

जडेजा राजस्थानकडे; सॅमसनची एन्ट्री

दरम्यान संघरचनेत मोठे बदल झाले आहेत. अनुभवी ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांची राजस्थान रॉयल्सकडे देवाणघेवाण झाली आहे. जडेजासारख्या महत्त्वाच्या खेळाडूचा संघाला निरोप देणे ही मोठी घडामोड मानली जाते. त्याच वेळी चेन्नईने राजस्थान रॉयल्सकडून यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. धोनीनंतरच्या काळाची तयारी CSK ने सुरू केली असल्याचे या निर्णयातून स्पष्ट संकेत मिळतात.

advertisement

निवृत्ती कधी? उत्तर अजून धूसर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

धोनी IPL 2026 मध्ये खेळणार हे निश्चित झाले असले, तरी त्याची अंतिम निवृत्ती कधी होईल, याचे उत्तर अजूनही अनुत्तरितच आहे. मात्र सध्या तरी CSK चाहत्यांना एकच दिलासा तो म्हणजे ‘थाला’ अजून मैदानात दिसणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPLमध्ये 20व्या ओव्हरचा थरार पुन्हा पाहायला मिळणार, धोनी खेळेल, नक्की खेळेल; CSK च्या सीईओंनी केलं शिक्कामोर्तब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल