TRENDING:

VIDEO : 25 मीटर उलटा पळाला, छाती भरून आली तरी थांबला नाही, भन्नाट कॅच, अख्खं स्टेडिअम पाहत राहिल

Last Updated:

श्रीलंकेने दिलेल्या 179 धावांचा झिम्बाबेने यशस्वी पाठलाग करून हा सामना 6 विकेटने जिंकला आहे. त्यामुळे झिम्बाबेने या सामन्यात दुसरा मोठा उलटफेर केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dasun Shanaka Catch video : टी20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाबेने आणखी एक मोठा उलटफेर करून दाखवला आहे. झिम्बाबेने बलाढ्य श्रीलंकेचा 6 विकेट राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने दिलेल्या 179 धावांचा झिम्बाबेने यशस्वी पाठलाग करून हा सामना 6 विकेटने जिंकला आहे. त्यामुळे झिम्बाबेने या सामन्यात दुसरा मोठा उलटफेर केला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या कॅप्टनने भन्नाट कॅच घेतली आहे. ही कॅच पाहून अंगावर काटा येईल अशी कॅच होती.या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
dasun shanaka takes brilliant catch
dasun shanaka takes brilliant catch
advertisement

झिम्बाबेला 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज होती.त्यावेळी सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट मैदानात होता.यावेळी 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सिकंदर रझा आऊट झाला. त्यानंतर त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर ताशिंगा मुसेकिवा देखील आऊट झाला. विशेष म्हणजे ताशिंगा मुसेकिवाने जोराचा शॉर्ट खेळला होता. हा शॉर्ट बाऊन्ड्री लाईनवर पोहोचत आला होता, त्यावेळेस श्रीलंकन कॅप्टन दासून शनाका 25 मीटर उलटा पळाला. या दरम्यान दुसरा एक खेळाडू देखील ही कॅच घ्यायला येत होता. पण शनाकाने त्याला रोखत जबरदस्त कॅच घेतली. या दोन विकेटमुळे कुठेतरी मॅच फिरेल असे वाटत होते. पण शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची गरज असताना झिम्बाबेच्या फलंदाजांनी पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर एक धाव आणि तिसऱ्या बॉलवर चौकार मारून हा सामना जिंकला होता.

advertisement

श्रीलंकेने दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाबेची सूरूवात चांगली झाली होती. झिम्बाबेकडून ब्रायन बेनेट आणि ताडीवानाशे मरुमानी सलामीली उतरले होते. या दोघांनी डावाला चांगली सूरूवात करून दिली होती. दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये 55 धावांची खेळी केली होती. यानंतर 69 धावांची पार्टनरशीप केल्यानंतर मरूमानी 34 वर बाद झाला होता.

advertisement

मरूमानी बाद झाल्यानंतर रायन बर्ल मैदानात आला होता. पण तो देखील 23 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर सिकंदर रझा मैदानात आला होता. त्यानंतर ब्रायन बेनेटने ताबडतोड खेळी करून झिम्बाबेला विजयाच्या नजीक आणले होते.ब्रायन बेनेटने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली होती. त्याच्यासोबत सिंकदर रझाने 26 बॉलमध्ये 45 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावरच झिम्बाबने हा उलटफेर करून दाखवला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाचे दर तेजीत, डाळींब आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

श्रीलंकेच्या प्रथम फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर पथूम निसांकाने 62 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्यासोबत पवन रथनायकाने 44 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर श्रीलंकेने 179 धावा केल्या होत्या. झिम्बाबेकडून ब्लेसिंग मुजरबानी, ब्रॅड इव्हान आणि ग्रीम क्रिमरने प्रत्येकी 2 विकेट काढली आहे. तर रायन बर्लने 1 विकेट काढली होती.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 25 मीटर उलटा पळाला, छाती भरून आली तरी थांबला नाही, भन्नाट कॅच, अख्खं स्टेडिअम पाहत राहिल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल