TRENDING:

Deepak Chahar : एका डिलिव्हरीमागे किती कमवतो? दीपक चहरने मन जिंकलं, Video शेअर करत शिकवला आयुष्याचा धडा!

Last Updated:

Deepak Chahar Viral Video : मी 12 तास काम करतो त्यावेळी कुठं मला 1200-1300 रुपये मिळतात, असं तो डिलिव्हरी बॉय सांगताना दिसतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Deepak Chahar Delivery Boy : मुंबई इंडियन्सचा स्टार बॉलर दीपक चहर याने सोशल मीडियावर एक डिलिव्हरी बॉयसोबत व्हिडीओ शेअर केला आहे. तुला एका डिलिव्हरीमागे किती रुपये मिळतात, असं दीपक चहर डिलिव्हरी बॉयला प्रश्न विचारतो. तेव्हा एका डिलिव्हरीमागे मला 25 ते 30 रुपये मिळतात, असं डिलिव्हरी बॉय सांगतो. त्यानंतर दिवसाला किती कमावतो आणि किती तास काम करतो, असा सवाल विचारल्यावर मी 12 तास काम करतो त्यावेळी कुठं मला 1200-1300 रुपये मिळतात. त्यात पेट्रोलचे पैसे देखील माझ्याकडेच असतात, असं तो डिलिव्हरी बॉय सांगताना दिसतोय.
Deepak Chahar Viral Video with Delivery Boy
Deepak Chahar Viral Video with Delivery Boy
advertisement

लाख रुपये असून पण...

महिन्याला 30-35 हजार रुपये मिळतात तरी देखील हा पैशांची बचत करतो आणि काही लोकांकडे लाख रुपये असून पण म्हणतात आमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. लोकांसाठी ही शिकण्यासाऱखी गोष्ट आहे, असं दीपक चहर रीलमध्ये म्हणाला. या रीलवर त्याने एक भन्नाट कॅप्शन देखील दिलंय.

काय म्हणतो दीपक चहर?

तुम्ही नेहमी लोकांशी बोलावं आणि त्यांचे संघर्ष जाणून घेतले पाहिजेत. मग आपल्याला कळेल की आपला संघर्ष काहीच नाहीत. मी लोकांकडून खूप काही शिकलो आहे कारण मला सर्व प्रकारच्या लोकांशी बोलणं आवडतं आणि त्यांच्या कथा आणि संघर्ष जाणून घेणं आवडतं. त्यांच्याकडून नेहमीच शिकण्यासारखं असतं, असं दीपक चहर म्हणाला.

advertisement

तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

दरम्यान, जर कोणी मला विचारलं की, तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? मी नेहमीच म्हणेन की प्रवास करा आणि लोकांशी बोला. अशा प्रकारे तुम्ही जीवन शिकता, असं म्हणत दीपक चहरने रील शेअर करत म्हटलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Deepak Chahar : एका डिलिव्हरीमागे किती कमवतो? दीपक चहरने मन जिंकलं, Video शेअर करत शिकवला आयुष्याचा धडा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल