चेन्नईचा संकटमोचक धावून आला
राजस्थान रॉयल्सने चेन्नईला धुळ चारल्यानंतर पंजाबच्या सरपंचने देखील सीएसकेचा पंचनामा केला अन् चेन्नईला त्यांच्याच मैदानात पुन्हा एकदा हरवलं. अशातच आता ऋतुराज गायकवाड संकटात साडला आहे. पण चेन्नईचा संकटमोचक आता धावून आल्याचं पहायला मिळतंय. चेन्नईचा 2.2 कोटींचा प्लेयर आता ऋतुराजच्या मदतीला धावून येणार आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा तिसरा कुणी नसून बेबी एबीडी म्हणजेच डेवाल्ड ब्रेव्हिस आहे.
advertisement
डेवाल्ड ब्रेव्हिस येत्या 11 तारखेला खेळणार
डेवाल्ड ब्रेव्हिस हा येत्या 11 तारखेच्या चेन्नई सुपर किंग्जच्या मॅचमध्ये खेळण्याची शक्यता आहे. येत्या 11 तारखेला चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा संकटमोचक डेवाल्ड ब्रेव्हिस आपली ताकद दाखवेल. डेवाल्ड ब्रेव्हिस याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे साऊथ अफ्रिकेला सेमीफायनलमध्ये पोहोचता आलं होतं.
सरावादरम्यान साईड स्ट्रेनची दुखापत
दरम्यान, डेवाल्ड ब्रेव्हिस गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुटूंबियांसोबत होता. आता तो संघासोबत सामील होणार असून येत्या काही दिवसातच तो आपला जलवा दाखवू शकतो. ब्रेविसला सरावादरम्यान साईड स्ट्रेनची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्धच्या मॅचेस गमावल्या. आता तो पूर्णपणे फिट असून दिल्लीविरुद्धच्या मॅचसाठी निवडीसाठी उपलब्ध असेल.
