दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा वनडे क्रिकेटच्या इतिहासातला हा दुसरा निच्चांकी स्कोअर आहे. 1993 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा 69 रनवर ऑलआऊट झाला होता.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 414 रन केल्या. जेकब बेथलने 110 आणि जो रूटने 100 रनची खेळी केली. याशिवाय जेमी स्मिथने 62, जॉस बटलरने नाबाद 62, डकेटने 31 आणि विल जॅक्सने नाबाद 19 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. या सामन्यात इंग्लंडने त्यांच्या बॅटिंगमध्ये तब्बल 50 फोर-सिक्स मारले.
advertisement
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडली
इंग्लंडने दिलेलं 415 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडली आणि त्यांचा फक्त 72 रनवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर आदिल रशीदला 3 आणि ब्रायडन कार्सला 2 विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फक्त 3 बॅटरना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. या सामन्यामध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला असला, तरी दक्षिण आफ्रिकेने सीरिज 2-1 ने जिंकली आहे.