आशियाई देशांमध्ये क्रिकेटला नवीन ओळख
बिंद्रा यांनी दिवंगत जगमोहन दालमिया यांच्या साथीने 1987 मध्ये भारतात पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, तोपर्यंत हे वर्ल्ड कप केवळ इंग्लंडमध्येच खेळवले जात होते. इंग्लंडबाहेर हा मोठा इव्हेंट यशस्वी करून त्यांनी क्रिकेट विश्वातील सत्तेचे समीकरण बदलून टाकले. त्यांच्या या ऐतिहासिक पावलामुळेच आशियाई देशांमध्ये क्रिकेटला एक नवीन ओळख आणि ताकद मिळाली.
advertisement
खेळपट्टी तयार करून घेतली
बिंद्रा यांचा कामाप्रती असलेल्या समर्पणाचा एक किस्सा आजही अनेकांच्या लक्षात आहे. एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचपूर्वी मोहालीत जोरदार पाऊस झाला होता. सर्वांना वाटले की मॅच होणार नाही, मात्र बिंद्रा यांनी हार मानली नाही. ते रात्रभर मैदानावर थांबले आणि ग्राउंड स्टाफकडून खेळपट्टी तयार करून घेतली. सकाळी जेव्हा लोक पोहोचले, तेव्हा मॅच वेळेवर सुरू होण्यास तयार होती, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पाकिस्तानचे मॅनेजर फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना फोन करून मॅच खेळण्यासाठी बोलावून घेण्यात आलं होतं.
बँकेकडून कर्ज मिळवून मैदान उभं केलं
मोहाली येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची उभारणी ही बिंद्रा यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. पीसीएचे माजी अधिकारी सुशील कपूर यांनी आठवण सांगितली की, हे स्टेडियम उभारण्यासाठी बिंद्रा यांनी जीवापाड मेहनत घेतली होती. त्याकाळी स्टेडियमसाठी कर्ज मिळवणे सोपे नव्हते, तरीही त्यांनी अनेक बँकांचे उंबरठे झिजवले आणि अखेर एका बँकेकडून कर्ज मिळवून 1996 च्या वर्ल्ड कपपूर्वी हे शानदार मैदान उभे केलं होतं.
