गंभीरने लाडक्या वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं
टीम इंडियासाठी साऊथ अफ्रिकाविरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. पण टॉस होण्याआधीच गौतम गंभीर अन् सूर्यकुमार यादवने जो निर्णय घेतला, त्यामुळे साऊथ अफ्रिकेच्या हातात सामना पोहोचला. तो निर्णय होता... अक्षर पटेलला वगळण्याचा. टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल याला बाहेर बसवून गौतम गंभीरने लाडक्या वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं. पण तो पूर्णपणे अपयशी ठरल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
ब्रेव्हिस आणि मिलरविरुद्ध अक्षर पटेल निर्णायक
टीम इंडियाचा प्लॅन बाबर पूर्णपणे फेल झाला. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात जेव्हा टीम इंडियाला विकेटची गरज होती, त्यावेळी मिडल ओव्हरमध्ये अक्षर पटेलने कमबॅक करत दोन विकेट काढल्या होत्या. त्यात बाबर आझमचा समावेश होता. साऊथ अफ्रिकेच्या ब्रेव्हिस आणि मिलरविरुद्ध अक्षर पटेल निर्णायक ठरला आहे. जिथं कमी तिथं आम्ही अशी भूमिका अक्षर पटेल नेहमी बजावताना दिसतो. त्यामुळे अक्षर पटेलला प्लेईंग इलेव्हनमधून ड्रॉप करणं टीम इंडियाला महागात पडलं. त्यावर टीम इंडियाच्या कोचने देखील कबुली दिली आहे.
रायन टेन डेश्काटे यांनी दिली कबुली
दरम्यान, आम्ही टीम कॉम्बिनेशन ठरवताना खूप चर्चा केली. पण आता मागे वळून पाहिल्यावर तो निर्णय चुकीचा वाटतो, असं रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलंय. तसेच अक्षरबद्दल काहीही कमी लेखायचं नाही. आम्ही निराश आहोत. कुणीही तुम्हाला वर्ल्ड कप सहज देणार नाही. एक चूक परवडू शकते. मात्र खेळाडू जोरदार पुनरागमन करू शकतात. पुढे दोन मोठे सामने आहेत, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करून असंही रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलं आहे.
