TRENDING:

IND vs SA : डेव्हिड मिलर आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये राडा! LIVE मॅचमध्ये कुणाच्याच लक्षात आलं नाही, 14 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?

Last Updated:

David Miller And Washington Sundar Fight : टीम इंडिया ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आणि डेव्हिड मिलर यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं आहे. 14 व्या ओव्हरमध्ये काय घडलं होतं? पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs SA Super 8 Match Fight : साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला अक्षर पटेलच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं होतं. मात्र, हा निर्णय पूर्णपणे फसल्याचं दिसून आलं. पराभवानंतर आता सुंदरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या महत्त्वाच्या मॅचमध्ये सुंदरला एकही विकेट घेता आली नाही आणि बॅटिंगमध्येही तो सपशेल अपयशी ठरल्याने टीम इंडियाला 76 रन्सनी पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आता वॉशिंग्टन सुंदरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
IND vs SA Heated Exchange Between david Miller And Washington Sundar
IND vs SA Heated Exchange Between david Miller And Washington Sundar
advertisement

14 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?

साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या मॅचदरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन डेव्हिड मिलर यांच्यात मैदानावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. 14 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली, जेव्हा सुंदरने बॉलिंग करताना अचानक स्वतःला रोखलं. मिलर नॉन-स्ट्रायकर एंडला क्रीझच्या खूप जवळ उभा असल्याचा दावा सुंदरने केला आणि अंपायरकडे तशी रितसर तक्रार देखील केली, ज्यामुळे मैदानावर तणावाचं वातावरण पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

advertisement

अंपायरने मध्यस्थी करत मिटवला वाद

ओव्हर संपल्यानंतर शेवटच्या बॉलवेळी मिलर आणि सुंदर एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून ईशान किशन, ट्रिस्टन स्टब्स आणि अंपायरने मध्यस्थी करत दोघांना एकमेकांपासून दूर केलं. सुंदरच्या या आक्रमकतेमुळे मॅचमध्ये काही काळ व्यत्यय आला होता. त्यामुळे मैदानात काही वेळ तणावाचं वातावरण होतं. मात्र, अनेकांना ओव्हर संपल्यामुळे नेमका वाद काय झाला होता, हे पाहता आलं नाही.

advertisement

पाहा Video

वॉशिंग्टन सुंदरची खराब कामगिरी

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? कसं कराल व्यवस्थापन, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 17 रन्स दिले, पण त्याला एकही यश मिळाले नाही. बॅटिंग करताना देखील त्याने 11 बॉलमध्ये केवळ 11 रन्स केले, जे 187 रन्सच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुरेसे नव्हते. टीम इंडियाचा डाव केवळ 111 रन्सवर आटोपला, ज्यामुळे सेमीफायनल गाठण्याचे भारताचे स्वप्न आता धुसर दिसत असल्याचं पहायला मिळतंय. या पराभवानंतर आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये भारताला विजय मिळवणं काहीही करून गरजेचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : डेव्हिड मिलर आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये राडा! LIVE मॅचमध्ये कुणाच्याच लक्षात आलं नाही, 14 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल