TRENDING:

Smriti Mandhana : स्मृतीचा धमाका... सांगलीच्या पोरीने इतिहास घडवला, वर्ल्ड क्रिकेटमध्ये झाला नवा विक्रम!

Last Updated:

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्मृती मानधनाने धमाका केला आहे. स्मृतीने 48 बॉलमध्ये 166.67 च्या स्ट्राईक रेटने 80 रन केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
थिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्मृती मानधनाने धमाका केला आहे. स्मृतीने 48 बॉलमध्ये 166.67 च्या स्ट्राईक रेटने 80 रन केले आहेत, ज्यात 11 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. स्मृतीसोबतच शफाली वर्माने 46 बॉलमध्ये 171.74 चा स्ट्राईक रेट आणि 12 फोर, 1 सिक्सच्या मदतीने 79 रन केले. तर रिचा घोषने 16 बॉलमध्ये नाबाद 40 आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 10 बॉलमध्ये नाबाद 16 रन केले. स्मृती आणि शफालीच्या धमाक्यामुळे पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 221 रन केले.
स्मृतीचा धमाका... सांगलीच्या पोरीने इतिहास घडवला, वर्ल्ड क्रिकेटमध्ये झाला नवा विक्रम!
स्मृतीचा धमाका... सांगलीच्या पोरीने इतिहास घडवला, वर्ल्ड क्रिकेटमध्ये झाला नवा विक्रम!
advertisement

स्मृतीचा विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण केल्या. मॅचमध्ये 27 वी रन घेताच स्मृतीने 10 हजार रनचा आकडा पार केला आणि मिताली राजचा महारेकॉर्डही तिने उद्ध्वस्त केलं. स्मृती ही महिला क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 10 हजार रन करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हे रेकॉर्ड मिताली राजच्या नावावर होतं. मितालीला 10 हजार रन पूर्ण करण्यासाठी 314 इनिंग लागल्या होत्या. पण स्मृतीने 10 हजार रन पूर्ण करण्यासाठी मितालीपेक्षा 34 इनिंग कमी खेळल्या.

advertisement

मिताली आणि स्मृतीशिवाय चार्लोट एडवर्ड्सने 316 इनिंगमध्ये आणि सुजी बेट्सने 343 इनिंगमध्ये 10 हजार आंतरराष्ट्रीय रन केले होते. स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार रन करणारी फक्त चौथी महिला आहे. मिताली राज महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारी महिला आहे, तिने 10,868 रन केले आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन

मिताली राज – 10868 रन

advertisement

सुजी बेट्स – 10652 रन

शार्लेट एडवर्ड्स- 10273 रन

स्मृति मंधाना – 10000 रन*

नॅट साइवर-ब्रंट – 8197 रन

हरमनप्रीत कौर – 8088 रन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: चिकनपेक्षा शेवगा महाग, डाळिंबानं खाल्ल मार्केट, रविवारी असं का घडलं
सर्व पहा

मेग लॅनिंग – 8007 रन

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृतीचा धमाका... सांगलीच्या पोरीने इतिहास घडवला, वर्ल्ड क्रिकेटमध्ये झाला नवा विक्रम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल