TRENDING:

VIDEO : अंपायरनंतर थर्ड अँपायरनेही OUT दिलं, तरी वेस्ट इंडिज खेळाडूचा राडा, बुमराहच्या ओव्हरला मोठा ड्रामा

Last Updated:

जसप्रीत बुमराहच्या ओव्हरला मोठा ड्रामा झाला आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूला अंपायरने आऊट दिलं त्यानंतर थर्ड अंपायरच्या निर्णयात देखील तो आऊट झाला. तरी देखील या खेळाडूने मैदानात मोठा राडा झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs West Indies : टी20 वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या ओव्हरला मोठा ड्रामा झाला आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूला अंपायरने आऊट दिलं त्यानंतर थर्ड अंपायरच्या निर्णयात देखील तो आऊट झाला. तरी देखील या खेळाडूने मैदानात मोठा राडा झाला होता.
jasprit bumrah shimron hetmyer
jasprit bumrah shimron hetmyer
advertisement

खरं तर वेस्ट इंडिजचा शाई होप बाद झाल्यानंतर संघाची संपू्र्ण भिस्त ज्या खेळाडूवर होती तो शिमरन हेटमायर मैदानात आला होता.भारताविरूद्ध तो खतरनाक फलंदाजी करेल असे वाटत होते. पण भारतानो त्याला 27 धावातच गुंडाळले होते. त्याचं झालं असं की भारताने शिमरन हेटमायरला आधीट बुमराहला राखीव करून ठेवले होते. त्यामुळे तो फलंदाजीला येताच बुमराहला पाचारण करण्यात आलं होतं.

advertisement

advertisement

बुमराहच्या पहिल्या दोन बॉलनंतर तिसऱ्या बॉलवर हेटमायर बॉल मारत असताना त्याच्या बॅटीला कड लागून संजू सॅमसनच्या हातात गेली होती. विशेष म्हणजे बॅटीला कड लागल्याचा आवाज आल्याने अंपायरने देखील लगेच आऊट दिले होते. पण शिमरन हेटमायरने क्षणाचाही विलंब न लावता रिव्ह्यू घेतला. या रिव्हयूमध्ये अल्ट्राएजमध्ये हेटमायरच्या बॅटीला कड लागल्याचे स्पष्ट दिसत असल्याने थर्ड अंपायरने देखील त्याला आऊट दिले. पण हा निर्णय हेटमायरला मान्यच नव्हता. वेस्ट इंडिजचा कोच डॅरने सेमी देखील डगआऊटमध्ये आश्चर्यचकीत झाला होता.त्यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोकणातील सर्वात मोठा शिमगा,रायगडमध्ये पेटते 50 फुटांची भव्य होळी,काय आहे परंपरा?
सर्व पहा

दरम्यान हेटमायर हा जसप्रीत बुमराहचा शिकार आहे. आतापर्यत 23 बॉलमध्ये बुमराहने हेटमायरला 6 वेळा आऊट केली होती. तसेच या विकेटनंतर बुमराहने रॉस्टन चेसला बाद केले होते. रॉस्टन चेसने उंचावर बॉव मारला, पण जास्त जोरात न मारल्याने सूर्याने हवेत झेप घेऊन भन्नाट कॅच घेतली होती. या कॅचमुळे भारताला एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट मिळाल्या होत्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : अंपायरनंतर थर्ड अँपायरनेही OUT दिलं, तरी वेस्ट इंडिज खेळाडूचा राडा, बुमराहच्या ओव्हरला मोठा ड्रामा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल