असिस्टंट कोचने चूक मान्य केली
टीम इंडियाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट यांनी या पराभवानंतर आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, आम्ही टीम कॉम्बिनेशन ठरवताना खूप चर्चा केली. पण आता मागे वळून पाहिल्यावर तो निर्णय चुकीचा वाटतो, असं रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलंय. तसेच अक्षरबद्दल काहीही कमी लेखायचं नाही. आम्ही निराश आहोत, असंही रायन टेन डोशेट यांनी म्हटलं आहे.
advertisement
वर्ल्ड कप सहज देणार नाही
कुणीही तुम्हाला वर्ल्ड कप सहज देणार नाही. एक चूक परवडू शकते. मात्र खेळाडू जोरदार पुनरागमन करू शकतात. पुढे दोन मोठे सामने आहेत, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करून असं देखील रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलं आहे.
मोठ्या विजयाची नितांत गरज
दरम्यान, भारताला आता आपले पुढचे दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचे आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला केवळ या दोन्ही मॅच जिंकायच्या नाहीत, तर एक मॅच मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे टीमचा नेट रन रेट खूपच खराब झाला असून, तो सुधारण्यासाठी मोठ्या विजयाची नितांत गरज आहे.
