TRENDING:

IND vs PAK : पराभव झाल्या झाल्या नक्वीवर तोंड लपवायची वेळ, मागच्या दाराने पळाला, VIDEO आला समोर

Last Updated:

पाकिस्तानच्या पराभवानंतर स्टेडिअममध्ये थाटात बसलेल्या पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mohsin Naqvi leaves R Premdasa stadium : श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तान 60 धावांनी पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 18 ओव्हरमध्ये 144 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे भारताने हा सामना 60 धावांनी जिंकला होता. पाकिस्तानच्या या पराभवानंतर स्टेडिअममध्ये थाटात बसलेल्या पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
PCB chief Mohsin Naqvi leaves R. Premadasa International Stadium.
PCB chief Mohsin Naqvi leaves R. Premadasa International Stadium.
advertisement

खरं तर बहिष्काराच्या नाट्यानंतर आयसीसीने दोन्ही देशांच्या बोर्डाना स्टेडिअममध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.या दरम्यान मिटींग ही होणार असल्याचे बोलले गेले होते. पण मिटींग झाली की नाही? याची ठोस माहिती मिळू शकली नाही. पण पाकिस्तानच्या पराभवानंतर थाटात बसलेल्या मोहसीन नक्वीची विचित्र अवस्था झाली होती इतकं मात्र नक्की आहे.

मोहसीन नक्वीने मागच्या अनेक दिवसापासून बहिष्काराचा नाटकं सूरू केलं होतं.त्यामुळे तो अनेत आठवडे चर्चेच्या केंद्रस्थानी होता. तसेच या बहिष्काराने पाकिस्तान बोर्डाचे प्रचंड मोठं नुकसान होणार होतं. मात्र तरी देखील मोहसीन नक्बी बहिष्कारावर ठाम राहिला होता.त्यानंतर संभाव्य नुकसान लक्षात येऊन पाकिस्तानने माघार घेतली होती.त्यामुळेच आजचा भारत पाकिस्तानचा सामना पार पडला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

दरम्यान आज ज्याप्रमाणे पीसीबी बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी मैदानात आले होते. ते पाहता त्यांना पाकिस्तानच्या खेळाडूंवर प्रचंड विश्वास होत होता.पण पोरांनी अध्यक्षांसमोर माती खाली. त्यामुळे मोहसीन नक्वींच नाकं कापलं. या पराभवानंतर मोहसीन नक्वीवर तोंड लपवून पळायची वेळ आली होती. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय चाहत्यांना हसू आवरता येत नाही आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पराभव झाल्या झाल्या नक्वीवर तोंड लपवायची वेळ, मागच्या दाराने पळाला, VIDEO आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल