दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील
भारताला आता सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होण्यासाठी झिम्बाब्वे (26 फेब्रुवारी) आणि वेस्ट इंडिज (1 मार्च) विरुद्धच्या दोन्ही मॅच जिंकणे अनिवार्य आहे. केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवाचा फटका भरून काढण्यासाठी हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. जर भारताने दोन्ही मॅच जिंकल्या, तर त्यांचे 4 पॉईंट्स होतील, जे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी आवश्यक आहेत. दक्षिण आफ्रिकेनेही त्यांच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या, तर दक्षिण आफ्रिका 6 पॉईंट्ससह अव्वल स्थानी राहील, जे टीम इंडियासाठी फायद्याचं ठरेल.
advertisement
तीन टीम्समध्ये टाय होऊ शकतो
टीम इंडियाने आगामी दोन्ही सामने जिंकले तर 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहून सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकेल. मात्र, जर वेस्ट इंडिज किंवा झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला हरवले, तर 4 पॉईंट्सवर तीन टीम्समध्ये टाय होऊ शकतो आणि अशा वेळी नेट रन रेट हाच अंतिम निर्णय घेईल. ग्रुप A मध्ये सध्याच्या पॉईंट टेबलनुसार, दक्षिण आफ्रिका 2 पॉईंट्स आणि +3.800 नेट रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानच्या आशा धूसर
दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 फेरीत पाकिस्तानच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा पावसाने धूसर केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धची पहिली महत्त्वाची मॅच पावसामुळे रद्द झाली आणि दोन्ही टीम्सना 1-1 पॉईंट देण्यात आला. ग्रुप 2 मधील सध्याच्या स्थितीनुसार, पाकिस्तानला आता इंग्लंड (24 फेब्रुवारी) आणि श्रीलंका (28 फेब्रुवारी) या दोन बलाढ्य टीम्सचा सामना करायचा आहे. जर पाकिस्तानने या दोन्ही मॅच जिंकल्या, तर त्यांचे एकूण 5 पॉईंट्स होतील.
पाकिस्तान सेमीफायनलसाठी रेड्डी?
पाच पॉईंट्ससह पाकिस्तान सेमीफायनलसाठी आपले स्थान जवळपास निश्चित करू शकेल, कारण या ग्रुपमधील इतर टीम्ससाठी इतके पॉईंट्स मिळवणे कठीण होऊ शकते. इंग्लंडने श्रीलंकेवर 51 रन्सनी मात करून आधीच 2 पॉईंट्स मिळवले आहेत आणि ते सध्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी इंग्लंडविरुद्धची आगामी मॅच ही एक प्रकारे 'नॉकआउट' मॅच असणार आहे. जर पाकिस्तानने ही मॅच जिंकली, तर त्यांचे 3 पॉईंट्स होतील, पण पराभव झाल्यास त्यांना श्रीलंकेविरुद्धची मॅच मोठ्या फरकाने जिंकून इतर निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
न्यूझीलंडने उरलेल्या दोन मॅच जिंकल्या तर...
दरम्यान, जर पाकिस्तानने दोन्हीपैकी केवळ एक मॅच जिंकली, तर त्यांचे 3 पॉईंट्स होतील. अशा स्थितीत त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या निकालांकडे पहावे लागेल. जर न्यूझीलंडने आपल्या उरलेल्या दोन मॅच जिंकल्या, तर त्यांचे 5 पॉईंट्स होतील आणि पाकिस्तान बाहेर पडेल. त्यामुळे केवळ विजय नाही, तर नेट रन रेट (NRR) सुधारण्यासाठी मोठ्या विजयाची पाकिस्तानला गरज आहे.
