TRENDING:

Sanju Samson ची एन्ट्री फिक्स! तिलक वर्मा की अभिषेक शर्मा? कुणाच्या जागेवर खेळणार? टीम इंडियाच्या कोचने दिली हिंट

Last Updated:

Ryan Ten doeschate On Sanju Samson : संजू सॅमसन हा एक पर्याय असून टॉप ऑर्डरमध्ये राईट हँड बॅट्समन आल्यास रणनीती आखणं सोपं जाईल, असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sanju Samson In Indias Playing XI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या 76 रन्सच्या पराभवामुळे टीम इंडियासाठी सेमीफायनलचं टेन्शन वाढलं आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारताचा विजयरथ या पराभवामुळे रोखला गेला असल्याने टीमसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला असून, आता टीम कॉम्बिनेशनमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर टीम इंडियाच्या कोचने भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये हिंट दिली आहे.
Ryan Ten doeschate hints Sanju Samson could be in playing Xi
Ryan Ten doeschate hints Sanju Samson could be in playing Xi
advertisement

संजू सॅमसन हा एक पर्याय

गेल्या तीन मॅचमध्ये टीम इंडियाने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावल्या आहेत, कारण विरोधी टीम पार्ट-टाईम ऑफ-स्पिनर्सचा वापर सुरुवातीलाच करत आहेत, असं असिस्टंट कोच रायन टेन डोशेट म्हणाले आहेत. त्यांनी मान्य केले की, सुरुवातीला विकेट्स पडल्यामुळे टीमवर प्रेक्षर वाढत आहे. संजू सॅमसन हा एक पर्याय असून टॉप ऑर्डरमध्ये राईट हँड बॅट्समन आल्यास रणनीती आखणं सोपं जाईल, असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं.

advertisement

संजूची एन्ट्री, वन डाऊनला इशान किशन

पण संजू सॅमसनला टीममध्ये खेळवायचं असेल तर टॉप ऑर्डरमधील एकाला खाली बसवणं गरजेचं आहे. त्यामुळे नुकताच सूर गवसलेल्या अभिषेक शर्माला बाहेर काढणार की फॉर्ममध्ये नसलेल्या तिलक वर्माला बेंचवरचा रस्ता दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाचे तिन्ही सलामीवीर झिम्बॉब्वेविरुद्ध खेळतील, अशी अपेक्षा आहे. अभिषेक आणि संजू ओपनिंगला असतील तर वन डाऊनला इशान किशनला खेळवण्याची शक्यता आहे.

advertisement

संजू सॅमसनची कामगिरी निराशाजनक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

दरम्यान, आपण पाहिलं तर, संजू सॅमसनच्या नावाची चर्चा असली तरी त्याची आकडेवारी फारशी आशादायक नाही. 2025 पासून संजूने ओपनर म्हणून 12 इनिंगमध्ये केवळ 156 रन्स केले असून त्याची सरासरी केवळ 13 ची आहे. या 12 मॅचपैकी केवळ 2 वेळा तो पॉवरप्लेनंतर मैदानावर टिकू शकला आहे. त्यामुळे संजूला संधी द्यायची की जुन्या खेळाडूंवरच विश्वास ठेवायचा, यावर टीम मॅनेजमेंटमध्ये गंभीर चर्चा होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson ची एन्ट्री फिक्स! तिलक वर्मा की अभिषेक शर्मा? कुणाच्या जागेवर खेळणार? टीम इंडियाच्या कोचने दिली हिंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल