अर्शदीप सिंग हा टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा भाग होता. टी-20 वर्ल्ड कपनंतर आता अर्शदीप सिंग आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून मैदानात उतरणार आहे. आयपीएलचा मोसम सुरू व्हायच्या आधी अर्शदीप सिंग एका कार्यक्रमाला उपस्थित होता.
गर्लफ्रेंडला घाबरतो का गंभीरला?
गर्लफ्रेंडला जास्त घाबरतोस का कोच गौतम गंभीरला? असा प्रश्न अर्शदीप सिंगला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अर्शदीप सिंगने या दोघांचंही नाव घेतलं नाही. मी फक्त देवालाच घाबरतो, असं अर्शदीप सिंग म्हणाला. या कार्यक्रमात बोलताना अर्शदीपने हॉरर फिल्म बघण्याचा त्याचा अनुभवही शेअर केला. हॉरर चित्रपट पाहताना तुम्ही एकटे नसता, तुमच्यासोबत आणखी 2-3 जणं असतात, जे दिसत नाहीत, असं वक्तव्य अर्शदीप सिंगने केलं.
advertisement
4 वर्ष लग्न करणार नाही
या कार्यक्रमात अर्शदीप सिंगला त्याच्या लग्नाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अर्शदीपने आपण अजून 3-4 वर्ष लग्न करणार नसल्याचं उत्तर दिलं. लग्नाबद्दल आपण वडिलांनाही सांगितलं आहे. माझ्या चेहऱ्यावर हसू पाहायचं असेल तर लग्नाबद्दल बोलू नका, असं वडिलांना सांगितलं असल्याचं अर्शदीप सिंग म्हणाला.
अर्शदीप सिंगच्या रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यावर अक्षर पटेल मला जास्त मोबाईल बघण्यापासून थांबवतो, असं अर्शदीप म्हणाला. तसंच लहान मुलांनी जास्त मोबाईल बघू नये, मोबाईलचा वापर कमी करा, असं आवाहनही त्याने केलं.
