शार्दुल ठाकूरने बॉलचा स्पीड 117 पर्यंत कमी केला ज्यामुळे केकेआरचा ओपनर फिन ऍलन याचा शॉट फसला आणि बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या तिलक वर्माने सोपा कॅच पकडला.
मुंबई इंडियन्सचा पहिली विकेट मिळवून दिल्यानंतर शार्दुल ठाकूर हा थेट रोहित शर्माच्या जवळ गेला आणि रोहित शर्मानेही रणनीती यशस्वी झाल्यासारखी प्रतिक्रिया शार्दुल ठाकूरकडे पाहून दिली. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला लखनऊकडून ट्रेड केलं आणि शार्दुलने मुंबईला मोसमाची पहिली विकेट मिळवून दिली.
advertisement
शार्दुल ठाकूरने यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कॅमरून ग्रीनलाही स्लो बॉल बाऊन्सरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 10 बॉलमध्ये 18 रन करून ग्रीन पॅव्हेलियनमध्ये परतला.
रोहित शर्मा मैदानात
आयपीएलच्या या मोसमात रोहित शर्मा इम्पॅक्ट सब म्हणून नाही तर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मोसमाच्या सुरूवातीलाच हे स्पष्ट केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात रोहित शर्माला थोडी दुखापत होती, त्यामुळे आम्ही त्याला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवलं, असं जयवर्धने म्हणाले.
रोहित शर्माला इम्पॅक्ट सब खेळवण्यावरून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. रोहित शर्मा 5 आयपीएल ट्रॉफी आणि टी-20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार आहे, त्याचा अनुभव कर्णधार हार्दिक पांड्याच्या कामी येऊ शकतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून देण्यात आल्या. यानंतर महेला जयवर्धने यांनी रोहितच्या फिटनेसच्या अडचणी असल्याचं सांगितलं.
मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोनच खेळाडू बॉलिंग करत नाहीत, त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला इम्पॅक्ट सब ठेवावं लागत असल्याचंही जयवर्धने म्हणाले होते, यानंतर आता पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव याला इम्पॅक्ट सब म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, रियान रिकलटन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शरफेन रदरफोर्ड, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, अल्लाह गझनफर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
