कमिन्सला पाठीच्या दुखापतीने सतावलं होतं, त्यामुळे याच दुखापतीचं स्कॅनिंग करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. पॅट कमिन्सच्या पाठीचं स्कॅनिंग क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निश्चित केलेल्या प्रक्रियेमार्फत केलं जाणार आहे, असं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे. गुरूवार 2 एप्रिलला कोलकात्यामध्ये केकेआर आणि हैदराबाद यांच्यात सामना झाला, या सामन्यानंतर कमिन्स भारतातून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून परवानगी मिळाल्यानंतर कमिन्स 17 एप्रिलला पुन्हा एकदा हैदराबादच्या टीममध्ये यायची शक्यता आहे.
advertisement
कमिन्सच्या गैरहजेरीत इशान कर्णधार
पॅट कमिन्सच्या गैरहजेरीमध्ये इशान किशन सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये हैदराबादचं नेतृत्व करत आहे. इशानच्या नेतृत्वात हैदराबादने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत, यातल्या एका सामन्यात त्यांचा विजय झाला तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद दोन पॉईंट्स आणि +0.469 नेटरनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे.
