TRENDING:

'आम्हाला घरी पोहोचवा', IPL गाजवलेला स्टार प्लेअर अडकला युद्धभूमीत, PM कडे मागितली मदत

Last Updated:

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आता भीषण रूप धारण केले असून, याचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आता भीषण रूप धारण केले असून, याचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे केवळ सामान्य जनताच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही दहशतीच्या सावटाखाली आहेत. आयपीएलमधील स्टार फलंदाज आणि इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टो सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकला असून त्याने सोशल मीडियावरून ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे.
News18
News18
advertisement

नेमकी घटना काय?

जॉनी बेअरस्टो सध्या 'इंग्लंड लायन्स' संघासोबत अबुधाबीमध्ये आहे. तो या संघासाठी कोचिंग आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे. १ मार्च रोजी पाकिस्तान शाहिन्स आणि इंग्लंड लायन्स यांच्यात ५० षटकांचा दुसरा सामना होणार होता. मात्र, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आणि या भागात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या इशाऱ्यामुळे हा सामना तातडीने रद्द करण्यात आला आहे.

advertisement

अबुधाबीमध्ये वास्तव्यास असलेल्या खेळाडूंना आणि स्थानिक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर हाय-अलर्ट प्राप्त झाले आहेत. यामध्ये संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका लक्षात घेता सुरक्षित इमारतींमध्ये आश्रय घेण्याच्या आणि खिडक्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परिसरात झालेल्या मोठ्या धमाक्यांच्या आवाजांमुळे खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

बेअरस्टोची आर्त हाक

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांना टॅग करत मदतीची विनंती केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "तुम्ही आम्हाला सुखरूप घरी पोहोचवू शकता का?" बेअरस्टोची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून युद्धभूमीत अडकलेल्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

advertisement

ECB आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोर्डाने म्हटले आहे की, "खेळाडू आणि कर्मचारी यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही सुरक्षा तज्ज्ञ आणि सरकार यांच्या सतत संपर्कात आहोत. परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल."

कोण आहे जॉनी बेअरस्टो?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

३६ वर्षीय जॉनी बेअरस्टो हा इंग्लंडचा एक स्फोटक फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्स (PBKS) कडून खेळताना ५२ सामन्यांत ३४.८७ च्या सरासरीने १६७४ धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी १०० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या बेअरस्टोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक धावा केल्या आहेत. सध्या तो राष्ट्रीय संघातून बाहेर असला तरी, कोचिंगच्या निमित्ताने तो या दौऱ्यावर आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'आम्हाला घरी पोहोचवा', IPL गाजवलेला स्टार प्लेअर अडकला युद्धभूमीत, PM कडे मागितली मदत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल