सचिन तेंडुलकर : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन (मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साल 1992 पासून 2011 पर्यंत एकूण 6 वर्ल्डकप खेळले. यादरम्यान त्याने 45 वनडे वर्ल्डकप सामन्यांमध्ये 2278 रन्स केले. हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच क्रिकेटपटूला मोडता आलेला नाही. विराट कोहलीने वर्ल्डकपच्या 26 सामन्यांमध्ये 1030 रन्स केले आहेत. तर, सचिननंतर रिकी पॉंटिंगचे सर्वाधिक 1743 रन्स आहेत. त्यानंतर कुमार संगकाराने 1532, ब्रायन लाराने 1225 आणि एबी डिविलयर्सने 1207 रन्स केले आहेत. परंतु सचिनचा रेकॉर्ड कोणीही ब्रेक केलेला नाही.)
advertisement
कुमार संगकारा: वर्ल्डकपमध्ये सलग चार शतक (2015च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगकाराने सलग 4 सामन्यांमध्ये शतक झळकावलं होतं. बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंडविरोधातील सामन्यांत त्याने हा पराक्रम केला होता. हा विक्रमसुद्धा आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला मोडता आलेला नाही. मात्र रोहित शर्माने 2019च्या वर्ल्डकपमध्ये सलग तीन शतक झळकावले होते.)
रोहित शर्मा: एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक (भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यांत 648 रन्स केले होते. यात 5 शतकांचा समावेश आहे. यासह तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा क्रिकेटपटू ठरला. त्यापूर्वी 2015 साली कुमार संगकाराने 4 शतक झळकावले होते.)
सचिन तेंडुलकर: एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन (वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तसाच वर्ल्डकपच्या एका सामन्यात सर्वाधिक रन्सचा रेकॉर्डही त्याच्याच नावे आहे. 2003 साली सचिनने वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 673 रन्स केले होते. त्याखालोखाल मैथ्यू हेडनने 2007च्या वर्ल्डकपमध्ये 11 सामन्यांत 659 रन्स केले होते. तर, 2019च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा हा सचिनच्या रेकॉर्डच्या फार जवळ पोहोचला होता.)
हर्शल गिब्स: वर्ल्डकपच्या एका ओव्हरमध्ये 6 सिक्स (2007च्या वर्ल्डकपमध्ये 16 मार्चला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हर्षल गिब्स याने एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स पटकावून अख्खं मैदान हादरवून सोडलं. गिब्सने नेदरलँडच्या डान वॅन बंजच्या बॉलिंगवर ही कामगिरी केली होती.)
