नेपाळची टीम टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून अधिकृतरित्या बाहेर झाली आहे. नेपाळने आपले तिन्ही सामने गमावले असल्याने त्यांना सुपर 8 मध्ये पोहोचता येणार नाही. नेपाळकडे एकही गुण नसल्याने आणि नेट रनरेट -1.942 असल्याने त्यांना काहीही केलं तरी इथून पुढं सुपर 8 मध्ये पोहोचता येणार नाही. ग्रुप सीमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सुपर 8 मध्ये पोहोचेल.
advertisement
West Indies into the super 8 vs Nepal out of T20 world cup
दरम्यान, नेपाळने पहिल्या 20 ओव्हरमध्ये 133 धावा केल्या होत्या. दीपेंद्र सिंग ऐरी याने एकट्याने 58 धावांची खेळी केली तर सोमपाल कामी याने 15 बॉलमध्ये 26 धावांची आक्रमक फटकेबाजी केली. तर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर याने चार गडी माघारी धाडले. त्यानंतर वेस्ट इंडिजने 16 व्या ओव्हरमध्ये आरामात धावांचं आव्हान पार केलं. शे होप याने 61 धावांची खेळी केली. तर हेटमायर याने 46 धावा कुटल्या.
अपडेट - विंडीजकडून पराभव पत्करल्यानंतर नेपाळ तिन्ही सामने गमावल्यानंतर स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडणारा दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी, ओमान स्पर्धेतून बाहेर पडला होता.
