TRENDING:

'घटस्फोटानंतरही मी युझीसोबत...', धनश्रीच्या वक्तव्याने नात्यात नवा ट्विस्ट, रिलेशनमधला सस्पेन्स वाढला!

Last Updated:

धनश्री वर्मा ही सध्या तिच्या क्रिकेटपटू युझवेंद्र चहलसोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली, पण आता स्वत: धनश्रीने केलेल्या वक्तव्यामुळे धनश्री आणि युझवेंद्र चहल यांच्या नात्यात नवा ट्विस्ट आल्याची चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डान्स रील्समुळे कायमच चर्चेत राहणारी धनश्री वर्मा ही सध्या तिच्या क्रिकेटपटू युझवेंद्र चहलसोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आली, पण आता स्वत: धनश्रीने केलेल्या वक्तव्यामुळे धनश्री आणि युझवेंद्र चहल यांच्या नात्यात नवा ट्विस्ट आल्याची चर्चा आहे. चित्रपट निर्माती आणि नृत्य दिग्दर्शक फराह खानसोबतच्या युट्युब व्लॉगमध्ये धनश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे. चहलसोबतचा घटस्फोट, डेन्टिस्ट म्हणून रणबीर कपूरवर केलेले उपचार तसंच भविष्याबद्दल धनश्री फराह खानसोबत बोलली आहे.
'घटस्फोटानंतरही मी युझीसोबत...', धनश्रीच्या वक्तव्याने नात्यात नवा ट्विस्ट, रिलेशनमधला सस्पेन्स वाढला!
'घटस्फोटानंतरही मी युझीसोबत...', धनश्रीच्या वक्तव्याने नात्यात नवा ट्विस्ट, रिलेशनमधला सस्पेन्स वाढला!
advertisement

'तू पहिल्यांदाच घरात एकटी राहत आहेस का? आधी तू तुझ्या पालकांसोबत राहत होतीस, त्यानंतर तुझं लग्न युझवेंद्र चहलसोबत झालं. तुम्ही दोघंही माझ्या पार्टीला आला होतात', असं फराह खान धनश्रीला म्हणाली. यावर धनश्रीने आता काही गोष्टी स्थिर झाल्या आहेत. मी युझीसोबत मेसेजेसवर संपर्कात आहे, तो मला माँ म्हणायचा, तो खूप गोड आहे, असं धनश्री फराह खानसोबत बोलताना म्हणाली आहे.

advertisement

काहीच दिवसांपूर्वी युझीवर टीका

दरम्यान काहीच दिवसांपूर्वी धनश्री वर्माने युझवेंद्र चहलवर त्याच्या टी शर्टवरून टीका केली होती. घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीवेळी चहलने 'बी युअर ओन श्युगर डॅडी' असा मेसेज लिहिलेला टी शर्ट घातला होता. या टी शर्टबद्दल धनश्रीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं. त्यावर तुला जे बोलायचं होतं, ते व्हॉट्सऍपवर पाठवायचं, टी-शर्ट का घातलास? असं उत्तर धनश्रीने दिलं.

advertisement

सायनाचा नात्याला दुसरा चान्स

दुसरीकडे भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पती पारुपली कश्यपसोबत घटस्फोट घेतला होता, पण घटस्फोटाच्या 19 दिवसानंतरच सायना आणि पारुपलीने त्यांचा हा निर्णय बदलला आणि नात्याला दुसरा चान्स द्यायचा निर्णय घेतला. आता धनश्री वर्मानेही ती युझवेंद्र चहलसोबत संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे या दोघांच्या नात्याबाबतही सस्पेन्स निर्माण झाला आहे.

advertisement

2020 मध्ये युझी-धनश्रीचं लग्न

2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊनमुळे डान्स क्लासेसवर निर्बंध लागू झाले, त्यामुळे धनश्री आणि युझवेंद्र चहल ऑनलाईन डान्स क्लासच्या निमित्ताने एकमेकांना भेटले. यानंतर डिसेंबर 2020 मध्ये, त्यांनी गुरूग्राममध्ये एका भव्य पारंपारिक समारंभात लग्न केले. फेब्रुवारी 2025 मध्ये, या दोघांनी वांद्रे फॅमिली कोर्टात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी संयुक्त याचिका दाखल केली होती आणि सहा महिन्यांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. यानंतर काही आठवड्यांनी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आणि त्यांच्या वेगळं होण्यावर शिक्कामोर्तब केलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'घटस्फोटानंतरही मी युझीसोबत...', धनश्रीच्या वक्तव्याने नात्यात नवा ट्विस्ट, रिलेशनमधला सस्पेन्स वाढला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल