TRENDING:

IND vs NZ : तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग नाय ना? न्यूझीलंडच्या प्लेयर्सने चेक केली अभिषेक शर्माची बॅट, पाहा Video

Last Updated:

New Zealand players checking Abhishek Sharma bat : तिसरा सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या प्लेयर्सने चक्क अभिषेक शर्माची बॅट चेक केली. अभिषेकने देखील आनंदाने बॅट न्यूझीलंडच्या प्लेयर्सला दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs NZ, Abhishek Sharma : गुवाहाटी येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकावून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतलं. अभिषेकच्या या तुफानी खेळीमुळे न्यूझीलंडचे खेळाडूही अवाक झाले असून त्यांनी मैदानावर चक्क त्याची बॅट तपासून पाहिलं. त्याचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
New Zealand players checking Abhishek Sharma bat
New Zealand players checking Abhishek Sharma bat
advertisement

अभिषेक शर्माने सूत्र हाती घेतली अन्...

टीम इंडियाने न्यूझीलंडने दिलेले 154 धावांचे लक्ष्य केवळ 10 ओव्हरमध्ये पूर्ण करून हा मॅच जिंकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धक्कादायक झाली होती, कारण संजू सॅमसन पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्माने सूत्र हाती घेत किवी बॉलरची धुलाई सुरू केली आणि मॅच पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला.

advertisement

अभिषेक शर्माची बॅट चेक केली

टीम इंडियाने 10 ओव्हर राखून टी-ट्वेंटी सामना जिंकल्याने आता ऑस्ट्रेलियासह इतर सर्व संघ धोक्याची घंटा मोजत आहेत. अशातच तिसरा सामना जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या प्लेयर्सने चक्क अभिषेक शर्माची बॅट चेक केली. अभिषेकने देखील आनंदाने बॅट न्यूझीलंडच्या प्लेयर्सला दिली. त्यावर सोशल मीडियामधून मजेशीर कमेंट्स येत आहेत. भावा तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग तर नाही ना? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.

advertisement

14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण

अभिषेकने या खेळीदरम्यान युवराज सिंगचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात हुलकावणी दिली. त्याने 14 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, जे भारतीय फलंदाजाकडून टी-ट्वेंटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. युवराज सिंगने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड अद्याप अबाधित राखला असून अभिषेक आता त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

advertisement

अभिषेक म्हणाला...

अभिषेक म्हणाला की, टीमची जी गरज आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी असे खेळणे सोपे नसते, पण ड्रेसिंग रूममधील वातावरण आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची असते. युवराज पाजींचा 12 बॉलचा रेकॉर्ड मोडणे जवळजवळ अशक्य आहे, पण सध्या ज्या प्रकारे सर्व फलंदाज खेळत आहेत, ते पाहता भविष्यात काहीही होऊ शकतं.

advertisement

भविष्यातील सर्वात मोठा मॅच विनर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भारतात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजीच साजरा का करतात? जाणून घ्या खरं कारण...
सर्व पहा

दरम्यान, या मॅचमधील विजयामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या या टी-२० मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अभिषेक शर्माच्या या इनिंगमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचा भविष्यातील सर्वात मोठा मॅच विनर म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे त्याने या सिरीजमध्ये अनेक मोठे विक्रम मोडीत काढले असून त्याची स्ट्राईक रेट सर्वांनाच थक्क करणारी आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग नाय ना? न्यूझीलंडच्या प्लेयर्सने चेक केली अभिषेक शर्माची बॅट, पाहा Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल