पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स पडल्या की...
सँटनरच्या मते, पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावणं त्यांच्यासाठी सर्वात मोठं नुकसान ठरलं. "पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स पडल्या की पुनरागमन करणं कठीण जातं," असं सँटनरने मान्य केलं. न्यूझीलंडने या मॅचमध्ये कसेबसे 150 धावांपर्यंत मजल मारली होती, परंतु ही धावसंख्या टीम इंडियाला रोखण्यासाठी पुरेशी नव्हती. भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक बॉलवर किवी फलंदाजांची परीक्षा घेतल्याचे कॅप्टन सॅटनरने आवर्जून सांगितलं.
advertisement
बॉलर्सवर पराभवाचं खापर फोडलं
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टीम इंडियाच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केलं आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला, ज्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, असं मत त्याने मॅच संपल्यानंतर व्यक्त केलं. मॅचनंतर त्याने टीम इंडियाच्या बॉलर्सवर पराभवाचं खापर फोडलं.
190 धावा होणं अपेक्षित
गुवाहाटीच्या मैदानावरील विकेट फलंदाजीसाठी उत्तम होती, असंही सँटनरने नमूद केलं. त्याने सांगितलं की, बाउंड्री लहान असल्याने आणि आउटफील्ड वेगवान असल्याने येथे 180 ते 190 धावा होणं अपेक्षित होतं. मात्र, पहिल्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांनी टाकलेले कटर्स बॉल खेळपट्टीवर ग्रीप घेत होते, ज्यामुळे फलंदाजी करणं आव्हानात्मक झालं. भारतीय खेळाडूंच्या अचूक टप्प्यामुळे किवी फलंदाजांना मोकळेपणाने फटके खेळता आले नाहीत.
चेन्नईची खेळपट्टी वेगळी
दरम्यान, भविष्यातील रणनीतीबद्दल बोलताना सँटनर म्हणाला की, खेळाडूंना विशिष्ट भूमिका दिल्या जातात आणि त्यांनी त्या पार पाडणं महत्त्वाचं असतं. आगामी काळात अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत होणाऱ्या मॅचसाठी ही एक चांगली तयारी असल्याचे त्याने सांगितलं. चेन्नईची खेळपट्टी येथील खेळपट्टीपेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते, त्यामुळे अशा विविध परिस्थितींमध्ये खेळल्याने टीमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
