बॉल स्पष्टपणे 'वाइड लाईन'च्या बाहेर
शेवटच्या बॉलवर श्रीलंकेला विजयासाठी 6 रन्सची आवश्यकता होती. शाहीन आफ्रिदीने हा बॉल 'ऑफ-स्टंप'च्या खूपच बाहेर टाकला. शनाकाने तो खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटला लागला नाही. रिप्लेमध्ये हा बॉल स्पष्टपणे 'वाइड लाईन'च्या बाहेर असल्याचे दिसत होते. जर अंपायरने याला वाईड दिला असता, तर श्रीलंकेला एक एक्स्ट्रा रन आणि एक एक्स्ट्रा बॉल मिळाला असता, ज्यामुळे मॅचचा निकाल बदलू शकला असता. त्यामुळे पाकिस्ताने मॅचमध्ये 12 वा खेळाडू अंपायरच्या रुपात खेळवला, अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
DRS ची मागणी नाही
अनुभवी अंपायर रॉड टकर यांनी हा बॉल नियमानुसार ठरवला आणि वाईडचा सिग्नल दिला नाही. या निर्णयामुळे शनाका मैदानातच थक्क झाला आणि तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानने ही मॅच जिंकली. शनाकाने या निर्णयावर डीआरएस (DRS) ची मागणी देखील केली नाही. अंपायरच्या या एका निर्णयामुळे श्रीलंकेच्या डगआऊटमध्ये संतापाची लाट उसळली. मुख्य कोच सनथ जयसूर्या आणि बॉलिंग कोच लसित मलिंगा बाउंड्री लाईनवर कमालीचे संतापलेले दिसले होते.
जयसूर्याने अंपायर्सशी वाद घातला
दरम्यान, मॅच संपल्यानंतर कोच जयसूर्याने अंपायर्सशी वाद घातला आणि आपल्या हरकती नोंदवली. त्याच वेळी मलिंगा देखील दासुन शनाकाशी बोलताना खूप रागात असल्याचे पाहायला मिळालं. मलिंगांना शनाकाच्या त्या पाचव्या बॉलवरील शॉट सिलेक्शनबद्दल त्याला झापलं. अंपायरिंगच्या खराब दर्जाचा फटका श्रीलंकेला बसला असून, मैदानावरील या वादग्रस्त निर्णयाची चर्चा आता जगभरातील क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
कोण आहे रॉड टकर?
रॉड टकर हे एक अनुभवी ऑस्ट्रेलियन क्रिकेट अंपायर आहेत. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९६४ रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे झाला. सध्या ते आयसीसीच्या (ICC) एलिट पॅनेलचे सदस्य असून आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रतिष्ठित पंच म्हणून ओळखले जातात. पंच होण्यापूर्वी रॉड टकर हे स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. त्यांनी १९८५ ते १९९९ या काळात न्यू साउथ वेल्स आणि टास्मानिया या संघांसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.
