पाकिस्तान कबड्डी फेडरेशन (पीकेएफ) ने शनिवारी झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर राजपूतवर बंदी घातली. फेडरेशन किंवा इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून अनिवार्य ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न घेता स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल आणि परदेशात प्रवास केल्याबद्दल तो दोषी आढळला. पीकेएफचे सचिव राणा सरवर म्हणाले की राजपूत याला शिस्तपालन समितीकडे अपील करण्याचा अधिकार आहे.
सरवर म्हणाले की, राजपूतने केवळ एनओसीशिवाय परदेश प्रवास केला नाही तर भारतीय टीमचे प्रतिनिधित्व करून जर्सी घालून आणि सामना जिंकल्यानंतर खांद्यावर भारतीय ध्वज गुंडाळून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले या वस्तुस्थितीची फेडरेशनने गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे राजपूतने हा दावा फेटाळून लावला आहे. या खाजगी स्पर्धेत मला कोणत्या टीमकडून खेळायचं आहे, याची माहिती देण्यात आली नव्हती, असं राजपूत म्हणाला आहे.
advertisement
जीसीसी कप दरम्यान भारतीय जर्सी घालून आणि भारतीय ध्वज फडकवतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजपूत अडचणीत सापडला. सरवर म्हणाले की, इतर खेळाडूंनाही एनओसीशिवाय स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल बंदी आणि दंड ठोठावण्यात आला आहे.
राजपूतने यापूर्वी माफी मागितली होती आणि सांगितले होते की त्याला बहरीनमधील स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि तो एका खाजगी टीमचा भाग होते. 'मला नंतर कळले की त्यांनी टीमचे नाव 'भारतीय टीम' ठेवले आहे. मी आयोजकांना भारत आणि पाकिस्तानची नावे वापरू नका असे सांगितले. पूर्वी, भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू खाजगी स्पर्धांमध्ये खाजगी टीमसाठी एकत्र खेळले आहेत, पण त्या टीमना भारत किंवा पाकिस्तान टीम असे नाव देण्यात आले नव्हते. मला चुकीची माहिती देण्यात आली होती', असं राजपूत म्हणाला आहे.
