स्वतः कप्तानी सोडणार की बोर्ड तुला काढून टाकेल?
पत्रकार परिषदेत सलमान आगा याला पाकिस्तानच्या कामगिरीवर प्रश्न विचारले गेले. त्यावेळी त्याने पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरवर पराभवाचं खापर फोडलं. एका पत्रकाराने थेट विचारलं की, "तुझी कामगिरी खराब राहिली, तू स्वतः कप्तानी सोडणार की बोर्ड तुला काढून टाकेल?" यावर सलमानने रागावण्याऐवजी शांतपणे हसून उत्तर दिलं आणि आपल्या बॅटिंगमधील अपयशाची प्रांजळ कबुली दिली. सलमानने यावेळी आपली चूक देखील मान्य केली.
advertisement
ज्या इंटेंटची टीमला गरज होती...
सर तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये मी नंबर 3 वर येऊन खूप चांगली बॅटिंग केली होती, पण या वर्ल्ड कपमध्ये मला हवी तशी कामगिरी करता आली नाही, असं सलमान अली आगा म्हणाला. ज्या इंटेंटची टीमला गरज होती, ते माझ्या खेळात दिसला नाही, ज्यामुळे मिडल ऑर्डरवर दबाव निर्माण झाला आणि टीमला पराभवाचा सामना करावा लागला, असंही सलमान यावेळी म्हणाला.
संपूर्ण बॅटिंग युनिट अपयशी
साहिबजादा फरहानचा अपवाद वगळता आमचे संपूर्ण बॅटिंग युनिट अपयशी ठरलंय. सध्या यावर कोणताही निर्णय झालेला नाही. कोणताही निर्णय घेताना तो इमोशनल असेल. आम्ही आधी घरी परत जाऊ, दोन-चार दिवस वेळ घेऊ आणि त्यानंतरच जो काही योग्य निर्णय असेल तो घेऊ, असंही सलमान अली आगा म्हणाला आहे. यावेळी त्याने बाबर आझम यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही.
