एका देशासाठी सोयीचे निर्णय
बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात मॅच खेळण्यास नकार दिला होता, ज्यानंतर आयसीसीने त्यांना स्पर्धेतून हटवून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला आहे. या निर्णयावर बोलताना नक्वी म्हणाले की, आयसीसी एका देशासाठी सोयीचे निर्णय घेते आणि दुसऱ्या देशासाठी मात्र पूर्णपणे वेगळी भूमिका घेते. हे 'डबल स्टँडर्ड्स' आता थांबायला हवेत, कारण बांगलादेश हा क्रिकेट विश्वातील एक मोठा स्टेकहोल्डर आहे.
advertisement
अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल
पाकिस्तानच्या सहभागाबाबत बोलताना मोहसीन नक्वी यांनी स्पष्ट केले की, या विषयावर अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल. पंतप्रधान सध्या देशाबाहेर असून ते परतल्यावर त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल. जर सरकारने वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा आदेश दिला, तर पाकिस्तानही या स्पर्धेतून माघार घेईल. अशा परिस्थितीत आयसीसीला 22 व्या टीमचा शोध घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरकारच्या निर्णयांना जास्त बांधील
नक्वी यांनी आयसीसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, आम्ही आयसीसीपेक्षा आमच्या सरकारच्या निर्णयांना जास्त बांधील आहोत. बांगलादेशला हायब्रीड मॉडेल (hybrid model) नाकारणे हे चुकीचे आहे, कारण पाकिस्तानला अशाच प्रकारची सवलत देण्यात आली आहे. एका देशाने दुसऱ्यावर आपली मर्जी लादणे हे क्रिकेटच्या हिताचे नाही, असे मत त्यांनी लाहोरमधील प्रेस कॉन्फरन्समध्ये व्यक्त केले.
टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर टांगती तलवार
सध्या सुरू असलेल्या या वादामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. बांगलादेशनंतर आता पाकिस्ताननेही माघार घेण्याचे संकेत दिल्यास ही स्पर्धा मोठ्या संकटात सापडू शकते. आता सर्वांचे लक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निर्णयाकडे लागले आहे, कारण त्यांच्या एका निर्णयावर या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून आहे.
