TRENDING:

2018 ला IPL खेळला, 8 वर्षात RCB विकत घेतली, सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर विराटच्या टीमचा मालक!

Last Updated:

2018 साली आयपीएल लिलावात बोली लागलेला क्रिकेटपटू आता आरसीबीच्या टीमचा मालक झाला आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ज्याला ओळखलं गेलं तोच आता विराट कोहलीच्या आरसीबीचा नवा मालक झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 2018 साली आयपीएल लिलावात बोली लागलेला क्रिकेटपटू आता आरसीबीच्या टीमचा मालक झाला आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ज्याला ओळखलं गेलं तोच आता विराट कोहलीच्या आरसीबीचा नवा मालक झाला आहे. आरसीबीच्या टीमची तब्बल 16,700 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप, द टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यांनी मिळून आरसीबीची टीम विकत घेतली आहे. आयपीएलच्या इतिहासातील ही सगळ्यात महागडी डील ठरली आहे.
2018 ला IPL खेळला, 8 वर्षात RCB विकत घेतली, सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर विराटच्या टीमचा मालक!
2018 ला IPL खेळला, 8 वर्षात RCB विकत घेतली, सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर विराटच्या टीमचा मालक!
advertisement

2026 च्या मोसमानंतर आदित्य बिर्ला ग्रुपचे आर्यमन विक्रम बिर्ला हे आरसीबीचे नवे चेअरमन असतील. आर्यमन बिर्ला हे आयपीएल 2018 मध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होते, तसंच त्यांनी भारतामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळलं आहे. आर्यमन बिर्ला हे भारताती आठवे श्रीमंत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचे पूत्र आहेत.

लहानपणापासूनच क्रिकेटची आवड

आर्यमन बिर्ला यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. तसंच भारताकडून क्रिकेट खेळायचं हे आर्यमन बिर्ला यांचं स्वप्न होतं. लहानपणापासूनच क्रिकेटचे धडे घेतल्यानंतर आर्यमन बिर्ला यांनी 2017-18 च्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ओडिशाविरुद्ध आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये आर्यमन बिर्ला यांनी रजत पाटीदारसोबत 72 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली.

advertisement

आर्यमन बिर्ला यांनी 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 414 रन केल्या. रणजी ट्रॉफीमधल्या चांगल्या कामगिरीनंतर आयपीएल 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सने आर्यमन बिर्ला यांना टीममध्ये घेतलं.

22 व्या वर्षी निवृत्ती

राजस्थान रॉयल्ससोबत एक वर्ष राहिल्यानंतर आर्यमन बिर्ला यांनी त्यांच्या क्रिकेट करिअरला रामराम ठोकला. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे 2019 साली आर्यमन बिर्ला यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आर्यमन बिर्ला कौटुंबिक व्यवसाय वाढवण्यासाठी काम करायला लागले.

advertisement

70 हजार कोटींचे मालक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

आर्यमन बिर्ला हे तब्बल 70 हजार कोटी रुपयांचे मालक आहेत. आर्यमन वारस असलेल्या आदित्य बिर्ला ग्रुप यांचं बाजार भांडवल सुमारे 8.3 लाख कोटी रुपये आहे. आर्यमन बिर्ला यांचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर आर्यमन बिर्ला यांचे 45.2 हजार फॉलोअर्स आहेत. तसंच आर्यमन बिर्ला सोशल मीडियावर वेळोवेळी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात, ज्यातून ते त्यांची लाईफस्टाईल दाखवतात.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
2018 ला IPL खेळला, 8 वर्षात RCB विकत घेतली, सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर विराटच्या टीमचा मालक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल