TRENDING:

VIDEO : हेल्मेटवर डोकं आपटलं, बॅट घेऊन अंगावर धावला, LIVE सामन्यात मोठा ड्रामा, नेमकं काय घडलं?

Last Updated:

जम्मू काश्मीरचा कॅप्टन पारस डोग्रा याने कर्नाटकच्या खेळाडूंच्या हेल्मेटवर डोकं आपटलं आणि तो काहीतरी पुटपुटला.ही घटना पाहून कर्नाटकचे खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. या दरम्यान मैदानात मोठा ड्रामा झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ranji Trophy Final : हुबळीच्या मैदानावर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या दोन संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेचा फायनल सामना सूरू आहे. या सामन्या दरम्यान मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जम्मू काश्मीरचा कॅप्टन पारस डोग्रा याने कर्नाटकच्या खेळाडूंच्या हेल्मेटवर डोकं आपटलं आणि तो काहीतरी पुटपुटला.ही घटना पाहून कर्नाटकचे खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. या दरम्यान मैदानात मोठा ड्रामा झाला होता.त्यामुळे जवळ जवळ 2 मिनिटं खेळ थांबला होता.
 jammu Kashmir captain parag dogra headbutts karnataka aneesh agarwal
jammu Kashmir captain parag dogra headbutts karnataka aneesh agarwal
advertisement

रणजी ट्रॉफी फायनल सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी रिटायर्ड आऊट झालेला जम्मू काश्मीरचा कॅप्टन पारस डोग्रा हा दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आला होता. यावेळी पारस डोग्राला अचानक काय झालं काय माहित नाही त्याने थेट जाऊन कर्नाटकच्या केवी अनिशच्या जवळ जाऊन हेल्मेटने हेल्मेटला टक्कर मारत राग व्यक्त केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

advertisement

खरं तर 101 व्या ओव्हर दरम्यान पारस डोग्राने एक चौकार मारला. त्यानंतर तो फिल्डींग करत असलेल्या अनीश जवळ गेला आणि त्याने हेल्मेटने टक्कर मारली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर मयंत अग्रवाल याने धावत मध्ये येऊन दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि डोग्राला समजावलं. त्यानंतर अंपायरने देखील डोग्राच्या कृतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर ओव्हर संपल्यानंतर डोग्राने अनीशची माफी देखील मागितली. पण अनीशने तिला माफ केले नाही. पण विषय इथेच मिटला नाही. त्यानंतर केएल राहुल आणि मयंक अग्रवालने डोगराच्या या वागण्यावर टीका केली.

advertisement

जम्मू काश्मीरचा पहिला डाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी पौष्टिक, नाश्त्याला घरीच बनवा उपम्याचे खमंग कटलेट, रेसिपीचा Video
सर्व पहा

जम्मू काश्मीरच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 6 विकेट गमावून 500 धावांचा पल्ला ओलांडला आहे. जम्मूकडून शुभम पुंडीरने 121 धावांची शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 12 चौकार लगावले आहेत. त्यानंतर येवर हसनने 88, कॅप्टन पारस डोगराने 70, अब्दुल समदने 61, कन्हैया वाधवानने 70 धावांची खेळी केली आहे. सध्या साहिल लोत्रा 57 धावांवर नाबाद आणि आबीद मुश्ताक 20 धावांवर नाबाद खेळतो आहे. या बळावर जम्मू काश्मीरने 6 विकेट गमावून 527 धावा केल्या आहेत. दरम्यान आता जम्मू काश्मीर आता पहिला डाव किती धावांवर घोषित करते?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : हेल्मेटवर डोकं आपटलं, बॅट घेऊन अंगावर धावला, LIVE सामन्यात मोठा ड्रामा, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल