TRENDING:

Rinku Singh Father Passes Away : टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन! कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

Last Updated:

Rinku Singh Father Passes Away : रिंकु सिंग याच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rinku Singh Father Passes Away : टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून वडील वेन्टिलेटरवर असल्याने घरी गेला होता. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी तो देशसेवेवर परत आला. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी तर मिळाली नाही. पण तो फिल्डिंगसाठी उतरला होता. अशातच आता त्याच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
Rinku Singh Father Passes Away due to cancer
Rinku Singh Father Passes Away due to cancer
advertisement

रिंकू सिंगचे वडील खाचंद्र सिंग हे स्टेज 4 लिव्हर कॅन्सरशी झुंजत देत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावरी होती. त्यानंतर त्यांना मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती. मात्र, अखेर त्यांना जास्त वेळ झुंज देता आली नाही. अशातच रिंकु सिंग आता घरी परत गेला असून अंत्यविधी झाल्यानंतर तो संघात सामील होईल.

advertisement

भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात रिंकु सिंग वडिलांना सोडून पुन्हा टीम इंडियासाठी परत आला होता. मॅच झाल्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलला गेला मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. रिंकु सिंगला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. पण तो फिल्डिंगला मैदानात उतरला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. त्यावेळी त्याने एक चूक देखील केली होती. त्याच्या हातातून एक कॅच देखील निसटला होता. मात्र, कॅप्टन सूर्या त्याला एका शब्दाने काहीही बोलला नाही.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

दरम्यान, रिंकू सिंग हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे. आयपीएलमध्ये यश दयालला एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. रिंकुने थेट टीम इंडियाची जर्सी घातली अन् भारताला देखील मोठमोठे सामने जिंकून दिले.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh Father Passes Away : टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन! कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल