TRENDING:

Vaibhav Suryavanshi : 'वैभवचा 'सरप्राइज फॅक्टर' संपला, नशिबाच्या जोरावर खेळतोय', IPL 2026 आधी रॉबिन उथप्पाची शॉकिंग भविष्यवाणी!

Last Updated:

Robin Uthappa On Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीवर टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलं आहे. वैभव सूर्यवंशी नशिबाच्या जोरावर खेळत असल्याचं रॉबिन उथप्पा याने म्हटलं आहे. त्याचं कारण देखील त्याने सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Suryavanshi in IPL 2026 : आयपीएलच्या मागील हंगामात आयपीएलने एक नाव स्टार उभा केला. त्याचं नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी... वैभव सुर्यवंशीने आपल्या स्टाईलमध्ये मैदानात कामगिरी केली अन् फक्त 14 व्या वयात त्याने आपली क्षमता जगाला दाखवून दिलीये. राजस्थान रॉयल्सकडून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनासाठी खेळताना त्याने विरोधी संघाची झोप उडवली होती. अशातच आता वैभव सूर्यवंशीवर टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलं आहे. वैभव सूर्यवंशी नशिबाच्या जोरावर खेळत असल्याचं रॉबिन उथप्पा याने म्हटलं आहे. त्याचं कारण देखील त्याने सांगितलं.
Robin Uthappa On Vaibhav Suryavanshi
Robin Uthappa On Vaibhav Suryavanshi
advertisement

सूर्यवंशीचा 'सरप्राइज फॅक्टर' संपलाय

आता वैभव सूर्यवंशीचा 'सरप्राइज फॅक्टर' संपलाय, असं रॉबिन उथप्पा म्हणाला. गेल्या वर्षी जेव्हा वैभव मैदानात उतरला होता, तेव्हा प्रतिस्पर्धी टीम्सना त्याच्या ताकदीबद्दल आणि कमकुवत दुव्यांबद्दल जास्त माहिती नव्हती. मात्र, आता प्रत्येक टीमने त्याच्या खेळाच्या कौशल्याचं सखोल विश्लेषण केलं असून त्याच्याविरुद्ध विशेष रणनीती आखली आहे. बॉलर्सना आता त्याला नेमकी कुठं बॉलिंग करायची आहे, याची पूर्ण कल्पना आली आहे, असंही रॉबिन उथप्पा म्हणाला.

advertisement

खेळाला नशिबाचीही साथ मिळतीये - उथप्पा

मी गेल्या 12 महिन्यांपासून वैभवच्या खेळावर बारीक लक्ष ठेवून आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे, पण मला वाटते की सध्या त्याच्या खेळाला नशिबाचीही साथ मिळत आहे. जेव्हा खेळाचा स्तर उंचावतो आणि बॉलर्सना तुमच्या कमतरता समजतात, तेव्हा खरी कसोटी लागते, असं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना उथप्पा म्हणालाय. मला वाटतं की हे वर्ष त्याच्यासाठी शिकण्याचं असेल, तो धावा नक्कीच करेल, पण गेल्या वर्षीसारखी कामगिरी करणं त्याला कठीण जाऊ शकतं, अशी भविष्यवाणी देखील उथप्पा याने केली आहे.

advertisement

ख्रिस गेलचं 175 धावांचं रेकॉर्ड मोडायचंय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीची अस्सल भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी खा 3 प्रकार, किंमत 60 रुपये! Video
सर्व पहा

दरम्यान, वैभव सूर्यवंशी याने यंदाच्या वर्षी देखील 10 वीचा पेपर दिला नाही अन् राजस्थानच्या डगआऊटमध्ये आयपीएलची तयारी करायला गेला आहे. तिथं तो बॉटिंगचे धडे गिरवतोय. मला आयपीएलमध्ये ख्रिस गेलचं 175 धावांचं रेकॉर्ड मोडायचंय, अशी इच्छा नुकतीच वैभव सूर्यवंशीने बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता वैभवचं स्वप्न पूर्ण होणार की रॉबिन उथप्पाची भविष्यवाणी, हे येणारा काळच ठरवेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 'वैभवचा 'सरप्राइज फॅक्टर' संपला, नशिबाच्या जोरावर खेळतोय', IPL 2026 आधी रॉबिन उथप्पाची शॉकिंग भविष्यवाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल