TRENDING:

सैफ अली खान आहे क्रिकेट संघाचा मालक, मिळवतो बक्कळ पैसा; पहिल्याच हंगामात मिळवले होते विजेतेपद

Last Updated:

Saif Ali Khan Cricket Team: घरात झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खान चर्चेत आला आहे. सैफचे वडील क्रिकेटपटू होते. मात्र सैफ एका क्रिकेट संघाचा मालक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पटौदी कुटुंबातील १०वा नवाब आणि अभिनेता सैफ अली खान यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सैफला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करम्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.दरम्यान हा हल्ला नेमका कशामुळे झाला याच्या सर्व शक्यता पोलिस तपासत आहेत. सैफ अली खान हा पटौदी कुटुंबातील १० नवाब आहे. त्याचे वडील मन्सूर अली खान पटोदी हे ९वे नवाब होते. सैफची संपत्ती १ हजार २०० कोटी पेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. चित्रपट, संपत्ती आणि अन्य व्यवसाय हे त्याचे उत्पन्नाचे साधन असले तरी फार कमी लोकांना माहिती आहे की सैफ एका क्रिकेट संघाचा मालक देखील आहे.
News18
News18
advertisement

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL)या स्पर्धेत सैफ अली खानचा एक संघ आहे. सैफ हा टायकर्ग ऑफ कोलकाता संघाचा मालक आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही एक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. ज्यात १० ओव्हरची मॅच खेळवली जाते. 2024 साली या लीगची सुरूवात झाली होती. आणि पहिल्याच हंगामात सैफच्या संघाने विजेतेपद मिळवले होते. सैफच्या संघाने माझी मुंबईचा 4 धावांनी पराभव केला होता.

advertisement

ना घरचे नोकर, ना करिना, सैफला रुग्णालयात कोणी नेले? रुग्णालयातून आली मोठी अपडेट

देशातील गरीब खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी या हेतूने ही लीग सुरू करण्यात आली. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि अमोल काळे हे देखील या लीगच्या कोअर समितीमध्ये सदस्य आहेत. या लीगचा पहिला हंगाम ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. या लीगचा दुसरा हंगाम २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

advertisement

सैफच्या क्रिकेटमधील कमाईचा विचार केल्यास या संघाच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. एका रिपोट्सनुसार संघातील खेळाडूंवर सैफ १ कोटी इतका खर्च करतो.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सैफ अली खान आहे क्रिकेट संघाचा मालक, मिळवतो बक्कळ पैसा; पहिल्याच हंगामात मिळवले होते विजेतेपद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल